scorecardresearch

ऋषभ पंतला वाचवणाऱ्या बस चालकाचा पानीपत डेपोकडून सत्कार; गाडीची काच फोडून पंतला काढलं होतं बाहेर

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला भीषण अपघातामधून वाचवणाऱ्या हरियाणा परिवहन महामंडळाच्या बस चालक आणि वाहकाचा पाणीपत डेपोकडून सत्कार करण्यात आला आहे.

ऋषभ पंतला वाचवणाऱ्या बस चालकाचा पानीपत डेपोकडून सत्कार; गाडीची काच फोडून पंतला काढलं होतं बाहेर
फोटो सौजन्य – सोशल मीडिया

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला भीषण अपघातामधून वाचवणाऱ्या हरियाणा परिवहन महामंडळाच्या बस चालक आणि वाहकाचा पाणीपत डेपोकडून सत्कार करण्यात आला आहे. सुशील मान आणि परमजीत सिंग अशी या दोघांनी नावे आहेत. दोघांनी पहाटे ऋषभ पंतला अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढत इतर लोकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले होते.

हेही वाचा – “तुम्हाला लाज…” ऋषभ पंतच्या अपघातानंतर व्हायरल फोटो पाहून रोहित शर्माची पत्नी संतापली

शुक्रवारी हरियाणा परिवहन महामंडळाची एक बस हरिद्वार ते पाणीपत जात असताना रस्त्याच्याकडेला एका एसयुव्ही गाडीचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. यावेळी गाडीचे चालक सुशील मान आणि वाहक परमजीत सिंग यांनी बसमधून उतरून अपघातग्रस्त गाडीजवळ पोहोचले. यावेळी जखमी व्यक्ती नेमकी कोण आहे, याचा अंदाजा त्यांना नव्हता. यावेळी ऋषभ पंतने त्याची ओळख सांगितली. तसेच त्यांनी त्याला खिडकीतून बाहेर काढत रुग्णवाहिका बोलावून त्याला रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा – Rishabh Pant Accident: उर्वशी रौतेलाने पांढऱ्या ड्रेसमधील फोटो केला शेअर; नेटकरी म्हणतात “त्याचा अपघात…”

दरम्यान, बस पाणीपत येथे पोहोताच या कार्याबद्दल पाणीपत डेपोने सुशील मान आणि परमजीत सिंग यांचा सत्कार केल्याची माहिती डेपोचे व्यवस्थापक कुलदीप झांगरा यांनी दिली. तसेच हरियाणा परिवहन विभागाचे मुख्य सचिव नवदीप सिंग यांनीही दोघांचे कौतुक केलं. आम्हाला दोघांचाही अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 23:46 IST

संबंधित बातम्या