हिंदू असल्याचं भासवलं आणि मुस्लिम तरुणाने फसवणूक केली. तसंच वडिलांशी सेक्स करायला लावला आणि जबरदस्तीने धर्मांतर करायला लावलं असा आरोप एका पीडित महिलेने केला आहे. २४ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अबिद नावाच्या तरुणाला अटक केली आहे. त्याने या पीडित महिलेला स्वतःची ओळख अनिकेत अशी करुन दिली होती.
महिलेने काय तक्रार दिली?
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार या तरुणाने या मुलीला अनिकेत म्हणून स्वतःची ओळख करुन दिली. त्याने या मुलीशी ओळख वाढवली, ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. पीडित मुलीसह शरीरसंबंध ठेवले. त्याने या मुलीला लग्नाचं वचन दिलं होतं. त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करु लागला. तुझे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी तो तिला देत होता. ही घटना उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये घडली आहे.




पीडित मुलीने असं सांगितलं की मला तरुणाने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि वडिलांशी शरीर संबंध ठेवायला भाग पाडलं. एवढंच नाही तर अबिदने मला जबरदस्तीने धर्मांतरही करायला लावलं असाही आरोप या पीडित महिलेने केला आहे. जेव्हा या सगळ्याबाबत मी अबिदकडे तक्रार केली तेव्हा त्याने मला मारहाण केली. एवढंच नाही तर त्याच्या कुटुंबाने मला कोंडून ठेवलं होतं. मी कशीबशी स्वतःची सुटका करुन पळाले असं या पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. इंडिया टुडेने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
बरेलीचे पोलीस अधीक्षक राहुल भाटी यांनी विषयीची माहिती देताना सांगितलं की आम्ही पीडित महिलेच्या तक्रारीवरुन बळजबरीने धर्म परिवर्तनाची तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असून अबिदला अटक केली आहे. पोलिसांनी अशीही माहिती दिली की आलीम नावाच्या एका मुलाने अशीच पद्धत वापरुन एका मुलीला फसवलं होतं. त्याने या मुलीला आपलं नाव आनंद आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर तिच्याशी मैत्री वाढवली, तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि लग्नाचं वचन देऊन शरीर संबंध ठेवले होते याविषयीचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.