रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यानचं युद्ध अद्यापही सुरूच आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आपल्या पहिल्या टेलिव्हिजन मुलाखतीत हॉलिवूड अभिनेता शॉन पेन यांनी या सुरू असलेल्या युद्धावर भाष्य केलं. तसेच रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युद्ध घोषित केले, त्या दिवशी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या भेटीबद्दलही पेन यांनी माहिती दिली आहे. त्यांनी झेलेन्स्की यांचं कौतुकही केलंय.

हॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक शॉन पेन हे युद्ध सुरू होण्यापूर्वी युक्रेनची राजधानी किव्ह येथे रशियाच्या हल्ल्यावरील एक शूट करण्यासाठी गेले होते. मात्र, रशियाने आक्रमण केल्यानंतर ते युक्रेनमधून बाहेर पडले होते. त्यांचा यासंदर्भातला एक फोटो व्हायरल झाला होता. दरम्यान, सीएनएनच्या अँडरसन कूपरला दिलेल्या एका टेलिव्हिजन मुलाखतीत, पेन यांनी युक्रेनमधील अनुभवाबद्दल सांगितलं.

Ecuadorian police break the Mexican embassy and arrested former vice president of Ecuador Jorge Glas
इक्वेडोरकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन; लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे संतापली…
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
discontent among people against ruling parties leaders in china
चिनी राज्यकर्त्यांविरुद्ध अफवांचा उच्छाद

रशियाशी तुमची चांगली मैत्री, युद्ध थांबवायला सांगा; युक्रेनचे भारताला आवाहन

ते म्हणाले की, “आमच्याकडे आणि आमच्या टीमच्या सदस्यांकडे युक्रेनधून बाहेर पडण्यासाठी सुविधा उपलब्ध होती. पण त्याच वेळी कितीतरी महिला आणि मुलं जीव मुठीत घेऊन सीमेपलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. काही जण एकटे तर काही गटाने तिथून निघाले होते. अनेक पुरूष तर बायका मुलांना सीमेपर्यंत सोडून रशियाविरोधात लढण्यासाठी माघारी जात होते,” असं त्यांनी सांगितलं.

Ukraine War: “रशियावर निर्बंध म्हणजे युद्धाची घोषणा…”; पुतिन यांचा पाश्चात्य देशांना गंभीर इशारा

सीनने युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या भेटीबद्दल देखील सांगितलं. आणि त्यांच्या धैर्याने मी प्रभावित झालोय असं ते म्हणाले. “मला माहित नाही की त्यांचा जन्म यासाठी झाला होता की नाही. परंतु मी त्यांच्या हिमतीला पाहिलंय. झेलेन्स्की हे युक्रेनियन लोकांचे असे प्रतिबिंब आहेत, जे धैर्याच्या दृष्टीने आधुनिक जगासाठी नवीन होते. त्यांनी ज्या प्रकारे युक्रेनमधील लोकांना एकत्र केलंय, ते पाहून त्यांच्याबद्दल जगभरात लोकांच्या मनात प्रेम निर्माण झालंय,” असं शॉन पेन म्हणाले.