करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगाची वाढली चिंता; आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक

ब्रिटनमध्ये पुन्हा कडक लॉकडाउन

(संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)

नव्या वर्षात लस आल्यानंतर करोनाची संपुष्टात येण्याची आशा असतानाच करोनाच्या नव्या प्रकाराने जगाची चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आला असून, त्याच्या प्रसाराचा वेगही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. या नव्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. विषाणूच्या नव्या प्रकारामुळे भारतही सर्तक झाला असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज तातडीची बैठक बोलावली आहे.

देशात करोनाचा प्रसार कमी होत आहे. दुसरीकडे लवकरच लसही येणार आहे. तीन कंपन्यांनी त्यासाठी अर्ज केला आहे. असं असतानाच करोनानं पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये सरकारला पुन्हा कडक लॉकडाउन लागू करावा लागला आहे. वेगानं पसरत असलेल्या या करोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आला असल्याचं ब्रिटन सरकारनं म्हटलं आहे.

आणखी वाचा- गरजू देशांना ‘युनिसेफ’ पुरवणार लस; पुढील वर्षअखेरपर्यंत चालवणार विशेष मोहिम

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. ब्रिटनसह नेदरलॅड, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही करोनाचा नवा प्रकार आढळून आला असल्याचं बीबीसीनं जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्यानं म्हटलं आहे. करोनाच्या या नव्या प्रकारामुळे भारतही सर्तक झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तातडीची बैठक बोलावली आहे. आज ही बैठक होत असून, आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होणार असल्याचं एम्सच्या तज्ज्ञांनी सांगितलं.

संयुक्त देखरेख गटाची आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या या नव्या प्रकाराबद्दल या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. रोडरिको ऑफ्रिन हे सुद्धा संयुक्त देखरेख गटाचे सदस्य आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Health ministry calls urgent meeting on monday over new covid 19 variant in uk bmh

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या