केरळच्या अनेक भागात मुसळधार पाऊस, कोट्टायममध्ये १० जण बेपत्ता; पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

केरळच्या दक्षिण आणि मध्य भागात शनिवारी मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आणि अनेक नद्यांना पूर आला आहे.

Heavy rain many parts kerala red alert five districts
(PTI Photo)

केरळच्या दक्षिण आणि मध्य भागात शनिवारी मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आणि अनेक नद्यांना पूर आला आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी रेड अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

केरळच्या पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान कार्यालयाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर सारख्या जिल्ह्यांमध्ये या काळात जास्तीत जास्त पाऊस पडू शकतो. केरळ किनारपट्टीवरील दक्षिण -पूर्व अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे, १७ ऑक्टोबर (रविवार) पहाटेपर्यंत राज्याच्या विविध ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, १८ ऑक्टोबर रोजी विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि १९ ऑक्टोबरच्या सकाळी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये आज मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने केरळच्या पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पठानमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर तिरुअनंतपुरम, कोल्लम, अलप्पुझा, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड आणि वायनाड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे भारतीय हवामान विभागाने राज्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

विजयन यांनी फेसबुक पोस्टमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे. दक्षिण आणि मध्य जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू झाला आहे आणि हवामानाच्या अंदाजानुसार, उत्तर जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढेल. संध्याकाळपर्यंत जाईल. मुसळधार पावसामुळे काही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे आणि काही धरणांच्या पाण्याची पातळीही वाढू शकते. त्यांनी नद्या आणि धरणांच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्यास तयार राहण्यास सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heavy rain many parts kerala red alert five districts abn

ताज्या बातम्या