सुरत, वडोदराला पावसाचा तडाखा; विमान, रेल्वे सेवा ठप्प

वडोदरातील वडसर परिसरात असलेल्या श्रीजी सोसायटीमध्ये दहा फुट लांबीची मगर शिरली होती.

मुसळधार पावसाने तडाखा दिल्याने दक्षिण गुजरातमध्ये शनिवारी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सुरतमध्ये सर्वत्र पाणी साचल्याने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असुन विमानसेवाही अहमदाबादला वळवण्यात आली आहे. पावसामुळे रेल्वेसेवेलाही फटका बसला आहे.

तुफानी पावसामुळे तापी आणि विश्वमित्रा नद्यांना पुर आला असुन दक्षिण गुजरातमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत सात जण वाहून गेले आहेत. पावसाची संततधार कायम राहिल्याने वडोदरातील हवाई वाहतूक बंद करण्यात आली. रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. तब्बल ११ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असुन, शहरातील बससेवेवर परिणाम झाला आहे.

वडोदरातील विश्वमित्र कॉलनीमध्ये अडकलेल्या नागरिकांना रेल्वे दलाच्या जवानांनी बिस्कीट, पाण्याच्या बाटल्या, दूधाची पाकिट पुरवली. सुरतमध्येही अशीच परिस्थिती असुन एअर इंडिया आणि स्पाईस जेटची विमाने अहमदाबादला वळविण्यात आली. दरम्यान, वडोदरातील वडसर परिसरात असलेल्या श्रीजी सोसायटीमध्ये दहा फुट लांबीची मगर शिरली होती. तिला वाचविण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. अहमदाबादमध्ये माणिक चौक परिसरात घर कोसळल्याने एकजण मरण पावला आहे. तर आगीत सापडलेल्या दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heavy rains lash surat vadodara public transport stoped bmh

ताज्या बातम्या