अपघातग्रस्त हेलिकॉप्टर ९ वर्षे सेवेत

रशियन हेलिकॉप्टर कंपनी कझानने उत्पादन केलेल्या या हेलिकॉप्टरवर हवामानविषयक रडार असून ते रात्रीही पाहता येणाऱ्या (नाइट व्हिजन) उपकरणांसह सज्ज आहे.

संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जण प्रवास करत असलेले एमआय १७ व्ही ५ हेलिकॉप्टर हे प्रगत असे लष्करी वाहतूक हेलिकॉप्टर असून, ते २०१२ पासून भारतीय हवाई दलाच्या सेवेत आहे.

रशियन हेलिकॉप्टर कंपनी कझानने उत्पादन केलेल्या या हेलिकॉप्टरवर हवामानविषयक रडार असून ते रात्रीही पाहता येणाऱ्या (नाइट व्हिजन) उपकरणांसह सज्ज आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये नवी पीकेव्ही-८ ऑटोपायलट यंत्रणा आणि केएनईआय-८ अ‍ॅव्हिऑनिक्स सूट आहे.

मानवीय आणि आपदा मदत मोहिमांसाठी, तसेच वाहतुकीसाठी वापरला जाणारा आपला हेलिकॉप्टरचा ताफा बळकट करण्याच्या उद्देशाने ८० एमआय१७व्ही५ हेलिकॉप्टर त्यात समाविष्ट करण्यासाठी भारताने २००८ साली रशियाशी करार केला होता. हा करार नंतर १५१ हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी विस्तारित करण्यात आला. या हेलिकॉप्टर्सची पहिली तुकडी सप्टेंबर २०११ मध्ये भारतात आली.

फेब्रुवारी २०१२ मध्ये फौजा आणि सामान उंचावरील भागांत वाहून नेण्याच्या आपल्या क्षमतेत वाढ करण्यासाठी भारतीय हवाई दलाने एमआय१७व्ही५ हेलिकॉप्टर्र्स औपचारिकरीत्या आपल्या ताफ्यात समाविष्ट केली. या हेलिकॉप्टरमध्ये क्षेपणास्त्रांविरुद्ध स्वसंरक्षण यंत्रणा, शस्त्रसज्ज कॉकपिट, महत्त्वाच्या यंत्रणा व घटक बसवण्यात आले आहेत.

असाधारण धैर्य आणि सेवा

राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री   :  संरक्षण दल प्रमुख जनरल रावत, त्यांची पत्नी व सशस्त्र दलाचे ११ कर्मचारी यांच्या अपघाती मृत्यूमुळे मला अतीव दु:ख झाले आहे. जनरल रावत यांनी असाधारण धैर्य आणि परिश्रम यांसह त्यांनी देशाची सेवा केली. रावत यांच्या अकाली मृत्यूमुळे सशस्त्र दलांचे आणि देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Helicopter crashed 9 years in service akp

ताज्या बातम्या