प्रजासत्ताक दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय सीमेपासून नियंत्रण रेषेपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वच जिल्ह्यात पोलिस अनेक ठिकाणी नाके लावून वाहने व संशयितांची चौकशी करत आहेत. दुसरीकडे, समाजकंटकांकडून धमकी देण्या आल्याने भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना प्रजासत्ताक दिनी हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

फोर्सचे महानिरीक्षक डीके बुरा यांनी सोमवारी सांगितले की, सीमेवर दोन आठवड्यांपासून कडक पहारा ठेवला जात आहे. याशिवाय जम्मू सीमेवर आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) सैनिकांकडून सुरुंगविरोधी ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. ते म्हणाले की, बीएसएफ सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रत्येक ‘नापाक ’ योजना हाणून पाडण्यासाठी सज्ज आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशद्रोही गडबड करू शकतात, असा अंदाज आहे.

Prime Minister Modi criticism in Kanhan meeting that India is anti development
‘इंडिया’ विकासविरोधी! कन्हानच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र
aap jantar mantar hunger strike
महात्मा गांधी ते ममता बॅनर्जी; उपोषण हे ‘राजकीय शस्त्र’ म्हणून कसे वापरले गेले?
india chiana Meeting in Beijing on India China border dispute
भारत-चीन सीमावादावर बीजिंगमध्ये बैठक; परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती
Loksatta sanvidhan bhan Secular citizenship of India
संविधानभान: भारताचे धर्मनिरपेक्ष नागरिकत्व

काश्मीर झोनच्या बीएसएफ अधिकार्‍यांनी सांगितले की, २०२१ या वर्षात दलाने विविध ऑपरेशन्समध्ये तीन एके-47 रायफल, सहा ९ एमएम पिस्तूल, दारूगोळा, २० ग्रेनेड, दोन आयईडी आणि १७.३ किलो अंमलीपदार्थ जप्त केले आहेत.

जम्मू विभागाचे एडीजी मुकेश सिंग यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी संपूर्ण विभागासह बाहेरून येणाऱ्या वाहनांची आणि लोकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. महामार्ग आणि सीमावर्ती गावांवर गस्त घालण्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, असेही सांगितले.