High School Firing News : अमेरिकेमधील जॉर्जियाच्या विंडरमधील एका शाळेत बुधवारी अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात १४ वर्षीय विद्यार्थ्याला अटक करण्यात आल्याचं वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. जॉर्जिया येथील शाळेत गोळीबाराची घटना घडल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अनेक पालकांनी त्यांची मुले सुरक्षित आहेत की नाही हे पाहण्यासाठी शाळेत धाव घेतली होती. ही घटना घडल्यानंतर शाळेच्यावतीने स्पष्टीकरण देत सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच एका निवेदनात म्हटलं की, "या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या प्रति मी शोक व्यक्त करतो. त्यांना आपले प्राण हिंसाचारामुळे गमवावे लागले." हेही वाचा : करवाढीवरून ट्रम्प-हॅरिस यांच्यात मतभेद Tragedy has struck Apalachee High School in North Georgia Sources confirm 9 injured, four fatalities and the shooter, evidently a student, is in custody pic.twitter.com/peaLL36bHa— Phil Holloway ✈️ (@PhilHollowayEsq) September 4, 2024 शाळेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, घटना नियंत्रणात आहे आणि विद्यार्थ्यांना दुपारी सोडण्यात आलं होतं. एबीसी न्यूजला प्रत्यक्षदर्शी विद्यार्थी सर्जियो कॅल्डेराने सांगितलं की, तो रसायनशास्त्राच्या वर्गात होता. त्यावेळी गोळीबाराचा आवाज ऐकू आला. यावेळी शिक्षकाने शाळेचा दरवाजा उघडला तेवढ्यात गोळीबाराचा आवाज येत होता. यानंतर शाळेचा दरवाजा बंद केला. मात्र, बाहेरून गोळ्यांचा आवाज आणि किंचाळण्याचा आवाज सुरु होता. दरम्यान, ही गोळीबाराची घटना का घडली? याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. मात्र, या गोळीबाराच्या घटनेमध्ये दोन विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आता १४ वर्षीय विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. तसेच या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, यूएसमध्ये गेल्या दोन दशकांत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शेकडो गोळीबाराच्या घटना घडल्याचं सामोर आलं आहे. २००७ मध्येही अशाच प्रकारे व्हर्जिनिया टेकमध्ये ३० हून अधिक मृत्यू झाल्याची घटना घडली होती.