वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे कच्चा तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे. याचा फटका सामान्य जनतेच्या खिशाला बसत आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील चलनांच्या खरेदीनुसार भारतातील एलपीजीची प्रति लिटर किंमत जगात सर्वाधिक आहे. देशातील किंमत ३.५ आंतरराष्ट्रीय डॉलर प्रति लिटर आहे. भारतानंतर तुर्की, फिजी, मोल्दोव्हा आणि युक्रेनमध्ये एलपीजीची सर्वाधिक किंमत आहे. दुसरीकडे, स्वित्झर्लंड, फ्रान्स, कॅनडा आणि यूकेमध्ये एलपीजीची किंमत आंतरराष्ट्रीय डॉलरपेक्षा कमी आहे.

पेट्रोलची किंमत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय डॉलरच्या दृष्टीने पेट्रोलच्या किमतीवर नजर टाकली, तर भारतात ती प्रति लिटर ५.२ आंतरराष्ट्रीय डॉलरवर बसते. ही किंमत अमेरिकेत १.२ आंतरराष्ट्रीय डॉलर, जपानमध्ये १.५, जर्मनीमध्ये २.५ आणि स्पेनमध्ये २.७ आंतरराष्ट्रीय डॉलर इतकी आहे. म्हणजेच या देशांमध्ये पेट्रोलचे दर भारताच्या तुलनेत खूपच कमी आहेत. डिझेलची किंमत जगाच्या तुलनेत आठव्या क्रमांकावर आहे. भारतात किंमत ४.६ आंतरराष्ट्रीय डॉलर आहे. जगातील सर्वात महाग डिझेल सुदानमध्ये आहे. तेथे त्याची प्रति लिटर किंमत ७.७ आंतरराष्ट्रीय डॉलर आहे. त्यानंतर अल्बानिया, तुर्की, म्यानमार, जॉर्जिया, भूतान आणि लाओस यांचा क्रमांक लागतो. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेच्या तुलनेत पाश्चात्य देशांमध्ये डिझेल खूपच स्वस्त आहे.

देशातील इंधनाच्या किमती वाढण्यामागे बाह्य कारणे आणि इतर देशांतील वाढीव किमती सांगितल्या जातात. मग इंधनाच्या किमती आपल्याला का अधिक त्रास देतात? खर्चाव्यतिरिक्त, खर्चाची क्षमता देखील ठरवते की दरवाढीचा तुमच्यावर किती परिणाम होतो. श्रीमंत देशांतील लोकांवर वाढत्या किमतींचा फारसा परिणाम होत नाही, तर गरीब देशांमध्ये वाढत्या किमतीचा लोकांच्या खिशावर मोठा परिणाम होतो. वेगवेगळ्या देशांमध्ये उत्पन्नाची पातळी देखील भिन्न आहे. हेच कारण आहे की पाश्चात्य देशांमध्ये पेट्रोलची एक लिटर किंमत ही लोकांच्या दैनंदिन उत्पन्नाचा नगण्य भाग आहे, तर सरासरी उत्पन्न असलेल्या भारतीयांसाठी ते त्यांच्या दैनंदिन उत्पन्नाच्या एक चतुर्थांश इतके आहे. आफ्रिकन देश बुरुंडीमधील सरासरी दैनंदिन उत्पन्नापेक्षा जास्त आहे. यामुळेच इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणामही देशानुसार बदलत असतो. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या प्रति लीटर किमतीची देशाच्या जीडीपीच्या दरडोईच्या संदर्भात तुलना केली आहे. अमेरिकेत पेट्रोलची किंमत सामान्य नागरिकांच्या दैनंदिन उत्पन्नाच्या ०.६ टक्के आहे, तर स्पेनमध्ये २.२ टक्के आहे. दुसरीकडे, सर्वसामान्य भारतीयांच्या रोजच्या कमाईतील २३.५ टक्के हिस्सा पेट्रोल खरेदीसाठी जात आहे. पाकिस्तानमध्ये ही संख्या २३.८ टक्के, नेपाळमध्ये ३८.२ टक्के आणि बुरुंडीमध्ये १८१.८ टक्के आहे.

मार्च महिन्यात प्रवासी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत घट, FADA अध्यक्षांनी सांगितली कारणं

कसं असतं गणित जाणून घ्या
मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १२० रुपयांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच १.५८ आंतरराष्ट्रीय डॉलर्स इतकी बसते. तुम्ही भारतात ७५.८४ रुपयांना जेवढ्या वस्तू खरेदी करू शकता, तितक्या वस्तू अमेरिकेत एका डॉलरमध्ये मिळणार नाही. उदाहरणार्थ, अमेरिकेत मार्चमध्ये एक किलो बटाट्याची किंमत १.९४ डॉलर्स इतकी होती. तुम्ही त्याचे रुपांतर भारतीय रुपयात केल्यास १४७ रुपयांवर जाते. या किमतीत भारतात मार्च महिन्यात या दरानुसार सात किलो बटाटे खरेदी करू शकता. यामुळेच विविध देशांतील देशांतर्गत किमतींची पीपीपी डॉलर म्हणजेच आंतरराष्ट्रीय डॉलरच्या आधारे केलेली तुलना योग्य म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार २०२२ मध्ये पीपीपीची सरासरी म्हणजेच आंतरराष्ट्रीय डॉलर २२.६ रुपये आहे.