पेट्रोल व डिझेल या इंधनांवरील अबकारी कर वाढवल्याने मिळणारी महसुली रक्कम ही कल्याणकारी योजनांसाठी वापरली जाईल, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
 ते म्हणाले की, हे पैसे युपीए राजवटीप्रमाणे काही लोकांच्या खिशात जाणार नाहीत, तर त्यातून लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येतील. युपीए सरकारने आम्हाला रिकामी तिजोरी दिली होती व ७० हजार कोटी रूपयांची महसुली तूट होती व आता जो पैसा जमा होईल त्यातून गरिबांसाठी योजना राबवण्यात येतील. भारत सरकारने कल्याणकारी योजना बंद करायच्या का, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.