फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांच्या समर्थनार्थ अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी ट्विटरवरुन डान्स करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. मरिन यांना या ट्वीटमध्ये टॅग करत “डान्स करत राहा” असं कॅप्शन क्लिंटन यांनी या पोस्टला दिलं आहे. आपल्या खाजगी निवासस्थानी काही सेलिब्रेटी आणि मित्रांसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मरीन यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या टीकाकारांना डॉन्स करतानाचा फोटो पोस्ट करत क्लिंटन यांनी चोख उत्तर दिलं आहे.

‘काला चष्मा’ या हिट गाण्यावर आफ्रिकन मुलांनी केला डान्स, VIRAL VIDEO पाहून तुम्हीही त्यांचे फॅन व्हाल!

देशाच्या पंतप्रधानपदी असताना मरीन यांची अशी वर्तवणुक अशोभनीय आहे, अशी टीका काही नेत्यांकडून करण्यात आली होती. मित्रांसोबत खाजगी कार्यक्रमात आनंद लुटण्याचा मरीन यांनाही अधिकार असल्याचं सांगत क्लिंटन यांच्यासोबतच अनेक जागतिक नेत्यांनी मरीन यांचं समर्थन केलं आहे. या ट्वीटनंतर सना मरीन यांनी हिलरी क्लिंटन यांचे आभार व्यक्त केले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव असताना २०१२ मधील कोलंबिया दौऱ्यादरम्यान सहकाऱ्यांसोबत डान्स करतानाचा क्लिंटन यांचा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

शाहरुख खानचा दिव्यांग फॅनसोबत ‘Chhaiya Chhaiya’ गाण्यावर डान्स; VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

३६ वर्षीय सना मरीन या आत्तापर्यंतच्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर मरीन यांनी स्पष्टिकरण दिलं आहे. “मी सुद्धा एक व्यक्ती आहे. या कठिण काळात मलाही मजा करावी वाटू शकते. काही जवळच्या लोकांसोबत आनंदात सहभागी व्हावं, असं मलाही वाटू शकतं” अशी भावना सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांना उद्देशून बोलताना मरीन यांनी व्यक्त केली आहे. यामुळे आपण कामाचा एकही दिवस चुकवला नाही, असेही मरीन पुढे म्हणाल्या आहेत. मरीन यांचा हा व्हिडीओ जगभरात मोठ्या प्रमाात व्हायरल होत आहे.