scorecardresearch

बस सहाशे फूट दरीत कोसळली; १९ जणांचा मृत्यू

भीषण अपघातामुळे बसचे तुकडे झाले असून बाहेर काढण्यात आलेले काही मृतदेह ओळखता येणेही शक्य नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

हिमाचल प्रदेशमधील सिरमुर जिल्ह्यातील एका गावाजवळ आज (शुक्रवार) एक बस सुमारे सहाशे फूट खोल दरीत कोसळल्याने १९ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे बसचे तुकडे झाले असून बाहेर काढण्यात आलेले काही मृतदेह ओळखता येणेही शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
या बसमधून प्रवास करणाऱया प्रवाशांची नेमकी संख्या कळू शकलेली नाही. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळातून १५ मृतदेह सापडले असून, जखमींपैकी चार जणांचाही मृत्यू झाला आहे. तसेच बसमधील सर्व प्रवासी स्थानिक असल्याचे स्पष्ट झाले आहे

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Himachal pradesh at least 19 dead in sirmaur as bus skids off road

ताज्या बातम्या