scorecardresearch

Himachal Pradesh Election 2022 : काँग्रेसपुढे नेतानिवडीचा पेच; मुख्यमंत्रीपदावर तिघांचा दावा

विधिमंडळ नेतेपदावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह, माजी प्रदेशाध्यक्ष सुखिवदर सिंग सुखू आणि मावळते विधिमंडळ पक्षनेते मुकेश अग्निहोत्री या तिघांनी दावा केला आहे.

Himachal Pradesh Election 2022 : काँग्रेसपुढे नेतानिवडीचा पेच; मुख्यमंत्रीपदावर तिघांचा दावा
काँग्रेसपुढे नेतानिवडीचा पेच

पीटीआय, शिमला : हिमाचलमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तिघांनी दावा केल्याने काँग्रेसपुढे पेच निर्माण झाल्यामुळे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेता निवडीचे अधिकार अखिल भारतीय काँग्रेस समिती अध्यक्षांना देण्याचा ठराव नवनियुक्त आमदारांच्या बैठकीत शुक्रवारी रात्री करण्यात आला. बैठकीनंतर प्रसार माध्यमांना माहिती देताना हिमाचल प्रदेश प्रभारी राजीव शुक्ला म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित करण्याचा अधिकार काँग्रेसच्या अध्यक्षांना देणारा एक ओळीचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला आहे. पक्षाचे निरीक्षक भूपेश बघेल, मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा शनिवारी त्याबाबतचा अहवाल पक्षनेतृत्वाला सादर करतील.

हिमालच विधानसभेच्या ६८ जागांपैकी काँग्रेसने ४० जागा जिंकल्या आहेत. परंतु विधिमंडळ नेतेपदावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह, माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंग सुखू आणि मावळते विधिमंडळ पक्षनेते मुकेश अग्निहोत्री या तिघांनी दावा केला आहे.  या तिघांपैकी मुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित करण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना देण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे.

 पक्षाच्या निरीक्षकांनी गुरुवारी नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीपूर्वी राज्यपाल राजेंद्र  आर्लेकर यांचीही भेट घेतली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा आणि राजीव शुक्ला यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना पक्षाच्या आमदारांची यादी सादर केली सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी वेळ मागून घेतला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 01:03 IST

संबंधित बातम्या