अमेरिकेतील 'हिंडेनबर्ग रिसर्च' संस्थेने अदाणी उद्योग समूहातील कथित गैरप्रकारांवर अलीकडं अहवाल जाहीर केला होता. त्यानंतर भांडवली बाजारात 'भूकंप' झाला आणि अदाणी समूहाचे समभाग मोठ्या प्रमाणात कोसळले. तसेच, अदाणी समुहाची संपत्ती निम्म्याहून कमी झाली. यानंतर आता 'हिंडेनबर्ग रिसर्च' संस्थेने आणखी एका धमाका केला आहे. हिंडेनबर्गने आता ट्विटरचे संस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सी यांना लक्ष्य केलं आहे. हिंडेनबर्गच्या अहवालात जॅक डोर्सी यांच्या पैशांची देवाण-घेवाण करणारी कंपनी 'ब्लॉक इंक'वर ( Block Inc ) फसवणुकीचा आरोप केला आहे. ब्लॉक इंकने आपले वापरकर्ते वाढवून दाखवल्याचा हिंडेनबर्गने म्हटलं आहे. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर ब्लॉक इंकच्या शेअर्समध्ये १८ टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली. हेही वाचा : गुगल, मेटानंतर आता अॅक्सेंचरची नोकरकपात, १९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार हिंडेनबर्गने म्हटलं की, दोन वर्षांच्या तपासानंतर हा अहवाल बनवण्यात आला आहे. ब्लॉक इंकने तंत्रज्ञानांच्या मदतीने मोठा घोटाळा केला आहे. तसेच, कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार ४० ते ७५ टक्के खाती बनावट आहेत. एकाच व्यक्तीशी संबंधित हे सर्व खाते आहेत. कंपनीने सतत गुंतवणूकदारांची दिशाभूल केली आहे, असंही हिंडेनबर्गनं सांगितलं आहे. हेही वाचा : दी आडनाव अवमानावरून राहुल गांधी दोषी, दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले… दरम्यान, 'हिंडेनबर्ग रिसर्च’च्या अहवालानंतर अदानी उद्योग समूहाचे समभागांमध्ये झालेल्या पडझडीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, बाजार नियामक ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ला (सेबी) दोन महिन्यांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.