नवी दिल्ली : भारतीय भाषिक कादंबरीच्या अनुवादाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळण्याचा ऐतिहासिक क्षण गुरुवारी हिंदी लेखिका गीतांजली श्री यांच्या पुस्तकामुळे लाभला. त्यांच्या ‘रेत समाधि’ या कादंबरीचा  डेझी रॉकवेल यांनी केलेला ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’ हा अनुवाद  पुरस्कारासाठी निवडण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेले समकालीन पोलिश, दक्षिण कोरियाई आणि जपानी साहित्यिकही या पुरस्काराच्या स्पर्धेत होते.

समकालीन, आजच्या वगैरे परिस्थितीवर भाष्यबिष्य करण्याच्या फंदात अजिबात न पडता गोष्टीत रमवणारी अशी ही कादंबरी आहे.  हा पुरस्कार मिळेल, याबाबत शाश्वती नव्हती. त्यामुळे मलाच हा आश्चर्याचा धक्का असल्याची प्रतिक्रिया गीतांजली श्री यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली. बुकर पुरस्काराच्या दीर्घ यादीत ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’सह वेगवेगळय़ा ११ भाषांतून अनुवादीत १३ पुस्तकांचा समावेश होता.  हा पुरस्कार ५० हजार ब्रिटिश पौंड इतक्या रकमेचा असतो. तो मूळ लेखिका आणि अनुवादकामध्ये विभागून देण्यात येतो.

president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
Vijay Bhatkar
डॉ. विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

थोडे कादंबरीविषयी..

या कादंबरीची गोष्ट भारतात, पाकिस्तानात आणि वाघा-अटारी सीमेवरही घडते. चंद्रप्रभा देवी ही ८० वर्षांची स्त्री दिल्लीच्या घरी पतिनिधनानंतर अंथरुणाला खिळलेली, पण एक दिवस तिची जीवनेच्छा जागृत होऊन ती हिंडूफिरू लागते, ‘स्त्री आणि पुरुष यांच्या सीमेवर’ असलेल्या एका तृतीयपंथीयाला भेटते आणि मग, मुलीसह पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेते- त्यासाठी पासपोर्ट, व्हिसाचे सोपस्कार पार पाडते. वाघा सीमेवरले ते संचलन पाहाताना तिला सआदत हसन मण्टो, कृष्णा सोबती यांच्यापासून सारे ‘सरहदी’ लेखक भेटतात.

थोडे लेखिकेविषयी..

उत्तर प्रदेशातील मैनपुरीत जन्मलेल्या आणि सध्या दिल्लीत वास्तव्याला असलेल्या गीतांजली यांची ‘रेत समाधि’ ही पाचवी कादंबरी आहे.  त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यातील अनेक इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, कोरियन भाषांमध्ये अनुवादित करण्यात आल्या आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्या इंग्रजीत आल्या आहेत, शिवाय भारतीयता आणि डावेपणा यांच्यातला दुभंग प्रेमचंदांच्या साहित्यात कसा  दिसतो, हे सांगणारा प्रबंध त्यांनी इंग्रजीत (गीतांजली पाण्डेय या नावानं) लिहिला, तोही ग्रंथरूप झाला आहे.