स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. अशाच एका यात्रेदरम्यान उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये नथुराम गोडसेच्या फोटोसह यात्रा काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने ही यात्रा काढली असून या यात्रेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – “हाच तुमचा अमृत महोत्सव आहे का?” बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींच्या सुटकेनंतर ओवेसींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

दरम्यान, या संदर्भात बोलताना हिंदू महासभेचे नेते योगेंद्र वर्मा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ”आम्ही स्वातंत्र्यदिनी तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. या तिरंगा यात्रेदरम्यान आम्ही अनेक क्रांतीकारकांचे फोटो लावले होते. त्यापैकी एक गोडसेचा फोटोही होता.”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Nitish Kumar Cabinet Expansion : ‘महागठबंधन’ सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार, वाचा कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं

महात्मा गांधी यांच्या धोरणामुळेच नथुराम गोडसेला गांधींची हत्या करण्यास भाग पाडले होते. गोडसे यांनी स्वतःचा खटला लढला होता. यावेळी गोडसेंनी न्यायालयात जे सांगितले, ते सर्व सरकारने जाहीर करावे. गांधींची हत्या का झाली हे जनतेला कळू नये, अशी सरकारची इच्छा आहे. गांधीजींची काही धोरणे हिंदुविरोधी होती. फाळणीच्या वेळी ३० लाख हिंदू आणि मुस्लीम मारले गेले आणि याला गांधी जबाबदार होते. देशातील काही लोकांच्या मनात गांधींबाबत आदर आहे, तसा आमच्या मनात गोडसेंबाबत आदर आहे.”, असेही ते म्हणाले.