देशात १११ मशिदी, चार चर्च, एक देऊळ बांधणारी एक हिंदू व्यक्ती म्हणजे जी गोपाळकृष्णन. जी गोपाळकृष्णन यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरील कलेचे भाव स्पष्ठ करतात. गोपाळकृष्णन हे लहानपणी इमारती आणि आर्किटेक्चरच्या क्षेत्राकडे आकर्षित झाले होते. त्यांनी बनवलेल्या वास्तूंमध्ये जास्त त्यांच्या मशिदी आहेत ज्या जगभरातील लोकांना आवडतात. हिंदू असलेल्या गोपाळकृष्णन यांनी १११ मशिदी बनवल्या आहेत. तसेच चार चर्च आणि त्यांच्या घराजवळील मंदिर देखील त्यांच्या पोर्टफोलिओचा एक भाग आहे.

गोपाळकृष्णन सांगतात, माणसाच्या बंधुत्वाची कल्पना मला १९६२ मधे आली, तेव्हा उन्हाळा होता. जेव्हा आमच्या कुटुंबावर परीस्थिती निर्माण झाली. तेव्हा मी एक हिंदू आहे तरी मशिदी बांधतो. त्यासाठी ख्रिश्चनांकडून पैसा येतो. हेच कारण आहे की २००२ मध्ये मी मानवमैत्री (युनिव्हर्सल ब्रदरहुड) एक धर्मादाय समाजाची सुरवात केली.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
wardha, Akhil Bharatiya Andhashraddha Nirmulan Samiti, Cremation Holikotsav, Remove Superstitions, Associated with Graveyard, terav movie, Harish Ithape,
आज पौर्णिमेस स्मशानभूमीत ‘तेरवं, काय आहे प्रकार जाणून घ्या

जी गोपाळकृष्णन यांची जीवन गाथा जेष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट केली आहे.

गोपाळकृष्णन म्हणतात, बंधुत्वाबद्दल बोलताना त्याचे डोळे उत्साहाने भरुन जातात. ते आता ८५ वर्षांचे आहेत आणि त्यांच्यापुढे ६० वर्षांपूर्वीच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या आहेत.

गोपाळकृष्णन यांचे वडील गोविंदन एक ठेकेदार होते. गोपाळकृष्णन यांचे ते पहिले शिक्षक होते. त्यांना मुख्य अभियंता टी.पी. कुट्टियम्मु साहिब यांच्या देखरेखीखाली पलयम जुमा मशिदीचे पुणर्निर्माण करावे लागले. कुट्टियम्मु यांच्यासोबत आयुष्यभाराची मैत्री असलेल्याचे गोपाळकृष्णन मोठ्या उत्साहात सांगतात.

गोपाळकृष्णन सांगतात, पलयम जुमा मशिदीचे रेखाचित्र तत्कालीन मुख्य आर्किटेक्ट जेसी अलेक्झांडर यांनी बनवले होते आणि त्यानंतर मशिदीच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्या. वडील गोविंदन यांना निविदा मिळाला. मात्र कुटुंबाकडे इमारतीसाठी पैसे नव्हते. त्यावेळी गोपाळकृष्णन यांना एजी कार्यालयातील अधिकारी पी.पी.चुम्मर यांच्याकडून ५,००० रुपये मिळाले, त्यासाठी त्यांनी कर्ज घेण्यासाठी एक आराखडा आणि अंदाज तयार केला होता. इमारतीची आवश्यकता निकड नसल्यामुळे गोपाळकृष्णन यांना मशिदीसाठी वापरण्यास परवानगी देण्यास चुम्मर खुश होते.

हेही वाचा- उर्जेला सलाम! हैदराबादच्या ‘या’ दाम्पत्याने गेल्या ११ वर्षांत शहरातील दोन हजाराहून अधिक खड्डे भरले

या प्रकारे एका हिंदु कुटुंबाने एका ख्रिश्चनांचा पैसा मुस्लिस मशिद उभारण्यासाठी वापरला, असे गोपाळकृष्णन सांगतात. त्यानंतर ५ वर्षानंतर मशिद तयार झाली आणि तिचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसेन यांनी केले. त्याच वर्षी १९६७ मध्ये गोपाळकृष्णन यांना आणखी एक मोठा प्रकल्प मिळाला, तो पुन्हा कुट्टीअम्मु साहिबच्या माध्यमातून. त्यांना तिरुअनंतपुरमच्या हद्दीत प्रसिद्ध मशिदी बेमपल्ली दर्गा शरीफच्या पुनर्बांधणीची योजना बनवायची होती.

गोपाळकृष्णन सांगतात “तेव्हा मी ३१ वर्षाचा होतो आणि खूप उत्साही होतो. तेव्हा घरात वीज नव्हती आणि मी दिवसा रात्रंदिवस योजनेवर काम केले. जेव्हा योजना अखेर पूर्ण झाली आणि मी ते कुट्टीअम्मू साहिबांकडे गेलो, तेव्हा ते म्हणाले की ते सुंदर आहे” अशा प्रकारे गोपाळकृष्णन यांच्या कलेला वाव मिळत गेला.