लंडन : ब्रिटनमधील हिंदूधर्मीय सर्वात निरोगी आणि सुशिक्षित धार्मिक समूहांपैकी एक आहेत असे इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात अलीकडील जनगणनेमध्ये दिसून आले आहे. तसेच स्वत:चे घर असणाऱ्यांमध्ये आघाडीवर असलेल्या धार्मिक समूहामध्ये शीखधर्मीयांचा समावेश होत असल्याचेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

ब्रिटनमध्ये मार्च २०२१ मध्ये ऑनलाइन जनगणना झाली होती. त्या वेळी देशाच्या लोकसंख्येमधील विविध समूहांसंबंधी माहिती प्रसिद्ध करण्यासाठी जनगणनेच्या आकडेवारीचे विश्लेषण केले जात आहे.

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

या आठवडय़ात ब्रिटनच्या जनगणना कार्यालयाकडून विविध धार्मिक समूहांची घर, आरोग्य, रोजगार आणि शिक्षण यासंबंधी माहिती प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये ८७.८ टक्के हिंदूधर्मीयांनी ‘अतिशय उत्तम’ किंवा ‘उत्तम’ आरोग्य असल्याचे नमूद केले, राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण ८२ टक्के इतके आहे. त्याबरोबरच हिंदूंमध्ये शारीरिक अपंगत्व असल्याचे प्रमाणही सर्वात कमी नोंदवण्यात आले आहे.

ब्रिटनमधील हिंदूंमध्ये शिक्षणाचे प्रमाणही राष्ट्रीय लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. ब्रिटनमध्ये शिक्षणाची सर्वोच्च पातळी ही स्तर ८ इतकी आहे. स्तर ४ आणि त्यापेक्षा वरील पातळीचे शिक्षण (प्रमाणपत्र स्तर) घेणाऱ्या हिंदूंचे प्रमाण ५४.८ टक्के इतके आहे. राष्ट्रीय पातळीवर हेच प्रमाण ३३.८ टक्के इतके आहे.

ब्रिटनमधील शीख समुदायाची गणना सधन गटामध्ये होत असल्याचे या जनगणनेमध्ये दिसून येत आहे. स्वत:चे घर असण्याची शक्यता असलेल्यांमध्ये शीखधर्मीय आघाडीवर आहेत. ब्रिटनमधील ७७.७ टक्के शेतकऱ्यांचे स्वत:च्या मालकीचे घर आहे. या जनगणनेत विचारण्यात आलेले धार्मिक प्रश्न ऐच्छिक असतात, २०२१ मध्ये झालेल्या जनगणनेत इंग्लंड आणि वेल्समधील ९४ टक्के नागरिकांनी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.