“हिंदू बहुसंख्याक आहेत म्हणून अन्यथा…”; भाजपा राष्ट्रीय महासचिवांचा इशारा

अफगाणिस्तानातील स्थितीवर हिंदुत्ववादी संघटनांनी बोट ठेवलं आहे. आता भाजपाचे राष्ट्रीय महासचिव सी टी रवि यांनी अफगाणिस्तानचा दाखला देत इशारा दिला आहे.

KT-Ravi
"हिंदू बहुसंख्याक आहेत म्हणून अन्यथा…"; भाजपा राष्ट्रीय महासचिवांचा इशारा (Photo- Facebook Account)

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष तिथल्या घडामोडींवर लागून आहे. अफगाणिस्तान शेजारी राष्ट्र असल्याने भारताची चिंता देखील वाढली आहे. तालिबान दहशतवादाला खतपाणी देत असल्याचा पूर्व इतिहास असल्याने भारताची प्रत्येक घडामोडींवर नजर आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानातील स्थितीवर हिंदुत्ववादी संघटनांनी बोट ठेवलं आहे. आता भाजपाचे राष्ट्रीय महासचिव सी टी रवि यांनी अफगाणिस्तानचा दाखला देत इशारा दिला आहे. हिंदू बहुसंख्याक असल्यानेच संविधान आणि महिला सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.

“जिथपर्यंत देशात हिंदू बहुसंख्याक आहेत तिथपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे लिहिलेलं संविधान कायम राहील. हिंदू बहुसंख्याक असेपर्यंत सर्वांना समान संधी मिळेल. एकदा का हिंदू अल्पसंख्याक झाले तर गंधार (अफगाणिस्तान) सोबत जे झालं तसं होईल”, असा इशारा भाजपा महासचिव सी टी राव यांनी दिला.

“…यासाठी भाजपा एका मोठ्या हिंदू नेत्याची हत्या करेल”, राकेश टिकैत यांचे खळबळजनक आरोप

“धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक सहिष्णुता ही आमची (हिंदू) मुख्य धारणा आहे. जोपर्यंत सहिष्णुता असलेले लोक बहुसंख्य असतील तोपर्यंत धर्मनिरपेक्षता असेल. महिलांना संरक्षण असेल. एकदा का सहिष्णुता असलेले लोकं अल्पसंख्याक झाले की अफगाणिस्तानसारखी स्थिती निर्माण होईल. एकदा त्यांची संख्या वाढली की ते शरियतबद्दल बोलतात. संविधानाबद्दल नाही.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं. “काँग्रेस आज देशाचं हित विसरली आहे. ते आंधळे झाले आहेत. देशभक्ती आणि दहशतवादातला त्यांना फरक कळत नाही. म्हणूनच ते आरएसएसची तुलना तालिबानशी करण्याचा प्रयत्न करतात”, असा आरोपही रवि यांनी काँग्रेसवर केला. “तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे आणखी पाकिस्तान निर्माण होऊ शकतात. यामुळे तुम्ही काही काळ सत्तेत येऊ शकता. पण यामुळे आणखी पाकिस्तान निर्माण होतील. जर हे रोखायचं असेल तर वस्तुनिष्ठपणे आणि देशाच्या हिताचं राजकारण करा. भाजपा तुष्टीकरणाचं राजकारणात गुंतणार नाही. सबका साथ सबका विकास या घोषणेसह हिंदुत्वाच्या प्रतिबद्धतेसह विकासाला प्राधान्य देऊ” असंही त्यांनी पुढे सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hindus in majority constitution and women will remain safe say ct ravi rmt

ताज्या बातम्या