भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा सतत त्यांच्या वक्तव्यांबाबत चर्चेत असतात. दरम्यान संबित पात्रा यांनी न्यूज १८ इंडियाला मुलाखत दिली. ते म्हणाले, हिंदू आपल्या चुकांमुळे शेकडो वर्षे गुलाम होता. त्याचबरोबर बंगालमध्ये अजूनही जिझिया कर भरला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

संबित पात्रा म्हणाले, “सरकारे येतील आणि जातील, इतकी वर्षे हिंदू गुलाम का आहेत? कारण तो स्वत: गुलाम होतो. तो स्वताला बेड्या विकत घेतो आणि स्वताच्या पायात घालतो. धिक्कार आहे अशा लोकांवर, बंगालमध्ये दररोज एक महिला मरत आहे. आमचे लोकं मुस्लिम खेड्यात जाऊ शकत नाहीत. अद्यापही जिझिया कर भरावा लागत आहे.”

हेही वाचा- राम मंदिर: आरोप करणाऱ्यांनी पावती दाखवून देणगी परत घ्यावी; साक्षी महाराजांचे आवाहन

“बाबर, औरंगजेब गेल्यानंतरही आम्ही जिझिया कर भरत आहोत. पण या सर्व मुद्द्यांवर कधी वादविवाद होत नाहीत. का होईल? कसा होईल? कारण आमचे पत्रकार तिथे जात नाहीत. आमचे लोकं घाबरले आहेत की आम्ही ट्विट केले तर आमच्यावर केस येईल, त्यांना भीती नाही.”,असे संबित पात्रा म्हणाले.