चंद्रगुप्त मौर्यांवर योगींनी केलेल्या वक्तव्यावरून ओवेसींची योगींवर टीका; म्हणाले “हिंदुत्व हा खोट्या…”

मुख्यमंत्री योगी यांच्या चंद्रगुप्त यांच्यावरील वक्तव्यावरून विरोधकांनी निशाणा साधला आहे.

aimim chief asaduddin owaisi slams yogi adityanath
(संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशातील निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे राजकीय पक्षांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीका वाढू लागली आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या चंद्रगुप्त यांच्यावरील वक्तव्यावरून विरोधकांनी निशाणा साधला आहे. त्यातच आता एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका करत हिंदुत्व हा केवळ खोट्या इतिहासाचा कारखाना असल्याचे म्हटले आहे.

ओवेसी म्हणाले, “हे आणखी एक उदाहरण आहे की आपल्याला चांगल्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेची गरज का आहे. हिंदुत्व हा खोट्या इतिहासाचा कारखाना आहे. चंद्रगुप्त आणि सिकंदर युद्धात कधीच भेटले नाहीत. हे आणखी एक उदाहरण आहे की आपल्याला चांगल्या सार्वजनिक शिक्षण पद्धतीची गरज आहे. चांगल्या शाळा नसल्यामुळे योगींना त्यांच्या सोयीनुसार नवनव्या गोष्टी रचायला मिळतात. योगीबाबा शिक्षणाला महत्त्व देत नाहीत, हेच त्यांनी दाखवून दिलंय, असं म्हणत त्यांनी योगींवर निशाणा साधला.

लखनऊमध्ये एका सामाजिक प्रतिनिधी परिषदेला संबोधित करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले होते, भारतीय इतिहासाकडे लक्ष वेधत ते म्हणाले, “इतिहासाचा विपर्यास कसा होतो! इतिहासाने चंद्रगुप्त मौर्याला महान म्हटले नाही, कोणाला महान म्हटले? जो त्याच्यापासून हरला त्या सिकंदरला महान म्हणतात. देशाची फसवणूक झाली आहे. पण इतिहासकार यावर मौन बाळगून आहेत, कारण सत्य भारतीयांसमोर आले तर समाज पुन्हा एकदा उभा राहील. जर, समाज उभा राहिला तर देशही उभा राहील. पंतप्रधान मोदी आज या देशाची उभारणी करत आहेत. जेव्हा आपण म्हणतो, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ तेव्हा हे मुद्दे हाताळले जातात.”

गौतम बुद्धांनी कधीही जगावर युद्ध लादले नाही – योगी आदित्यनाथ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hindutva is just a factory of false history says asaduddin owaisi hrc

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या