भारतात अर्थसंकल्पाचा एक मोठा इतिहास आहे. पहिल्यांदा अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला? कोणी आणि कशाप्रकारे तो सादर केला? अशा अनेक लक्षवेधी गोष्टी आहेत ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जाणून घेऊया भारतीय अर्थसंकल्पाशी निगडीत अशाच काही गोष्टी

ब्रिटिशकालीन भारताचा पहिला अर्थसंकल्प आणि जेम्स विल्सन
स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिला अर्थसंकल्प १८ फेब्रुवारी १८६९ मध्ये सादर करण्यात आला. जेम्स विल्सन यांनी तो सादर केला. जेम्स इंडियन काऊन्सिलचे (स्वातंत्र्यपूर्व) वित्तीय सदस्य होते. व्हॉइसरॉयला आर्थिक बाबींविषयी सल्ला देणे हे त्यांचे काम होते. अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यापूर्वी ते आपल्या कौटुंबिक व्यवसायात मदत करत असत. त्यांच्या कुटुंबियांचा टोपी बनविण्याचा व्यवसाय होता.

Difference Between Congress And BJP Manifestos Sankalp patra Nyay Patra
काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी योजने’ला भाजपाकडून ‘लखपती दीदी’चं प्रत्युत्तर; काय आहेत जाहीरनाम्यात महिलांसाठीच्या योजना
SBI, electoral bonds, confidential,
एसबीआयची अजब भूमिका! आधी रोखे गोपनीय अन् आता खर्चही गोपनीय
Loksatta sanvidhan bhan Secular citizenship of India
संविधानभान: भारताचे धर्मनिरपेक्ष नागरिकत्व
after germany us reacts to arvind kejriwal s arrest
अन्वयार्थ : अस्थानी त्रागा..

 स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जॉन मथाई हे दुसरे अर्थमंत्री बनले. १९४९-५० आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला होता. संसदेत हल्ली अर्थमंत्री जवळजवळ दोन तासांचे लांबलचक भाषण वाचन करतात. त्याकाळात मथाई यांनी संपूर्ण अर्थसंकल्पाचे वाचन न करता अर्थसंकल्पातील काही खास मुद्द्यांचेच संसदेत वाचन केले होते. या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच योजना आयोग आणि पंचवार्षिक योजनांचादेखील उल्लेख करण्यात आला मथाई यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाची ही विशेष बाब होती.

गव्हर्नरपदी असताना सादर केला अर्थसंकल्प

सी. डी. देशमुख अर्थसंकल्प सादर करणारे एकमात्र असे ‘रिझर्व बँक गव्हर्नर’ होते ज्यांनी रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी असताना अर्थसंकल्प सादर केला होता. १९५१-५२ चा अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी सादर केला होता. त्यावेळी सरकारला पैशांची आवश्यकता होती त्यासाठी कराच्या दरात वाढ करणे गरजेचे होते. यासाठी देशमुख यांनी अनोख्या मार्गाचा अवलंब करत जनतेला साद घातली होती. भारताच्या ग्रामीण भागातून आपल्याला एक पत्र आल्याचा उल्लेख देशमुख यांनी केला होता. पत्रात त्यांनी एका व्यक्तीचा उल्लेख केला होता. ज्याच्या गावातील कोणीच कर देत नसल्याचे त्याने पत्रात म्हटले होते. परंतु, त्याने करस्वरुपात दरवर्षी पाच रुपये भरून देशाच्या विकासात योगदान देण्याचे वचन दिले होते. कर भरण्यासाठी देशातील जनता उत्साहित व्हावी, यासाठी देशमुखांनी हे उदाहरण दिले होते.

पहिल्यांदा विदेशी संबंधाबाबत उल्लेख

सर्वसाधारणपणे अर्थसंकल्पात विदेशी संबंधांबाबत चर्चा अथवा उल्लेख करण्यात येत नाही. परंतु, सुरुवातीच्या अर्थसंकल्पात, विदेश संबंधावरदेखील प्रकाशझोत टाकला जात असे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यूके, यूएसए, यूएसएसआर (आता रशिया) सारख्या देशांकडून देशाच्या विकासासाठी भारताने आर्थिक सहाय घेतले होते. त्यामुळेच १९५० च्या अर्थसंकल्पामध्ये रशियासोबत देशाच्या संबंधाबाबतची माहिती समाविष्ट करण्यात आला होता. त्यावेळी देशाच्या खजिनाच्या मुख्य स्रोत असलेल्या विदेशी फंडाचादेखील त्यात उल्लेख होता. जवळजवळ १९५९ पर्यंत हे सुरु होते.

अर्थसंकल्पाचे मूलाधार

वित्तीय आवक
सरकारी तिजोरीतील पशांची आवक आणि अनुमानित खर्च यांच्या आधारे अर्थसंकल्प तयार केला जातो.
रद्दबातल होणे
एखाद्या विशिष्ट कामासाठी तरतूद करण्यात आलेला निधी जर वर्षांखेरीस वापरला गेला नसेल तर आपोआप रद्दबातल ठरतो.
अर्थसंकल्पाचे एकक
अर्थसंकल्प हा खातेनिहाय पद्धतीने सादर केला जातो

महत्त्वाचे दस्तावेज
*वार्षकि वित्तीय विवरण पत्र
*अनुदानाच्या मागण्या
*लेखानुदान विषयक मागण्या
*जावक अर्थसंकल्प – भाग 1
*जावक अर्थसंकल्प – भाग 2
*वित्त विधेयक
*वित्तीय विधेयकातील तरतुदी समजाऊन सांगणारे विवेचन
’अर्थसंकल्प – एका दृष्टीक्षेपात
*अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी
*विविध घोषणांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती
*वित्तीय जबाबदारया आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा यांच्याशी संबंधित कागदपत्रे
*अर्थसंकल्पीय भाषण अर्थात अर्थसंकल्पाची किल्ली

पैशाची आवक-जावक
* कर महसूल
* कर्जे आणि ऋण
अन्य आवक
* वित्त मंत्रालय
* योजनाबा सहाय्य
* योजनाबाह्य खर्च
* योजनांवरील खर्च
* राज्ये आणि
* केंद्रशासित प्रदेश
* राज्यांच्या योजनांना देण्यात येणारे केंद्राचे अर्थसहाय्य
* केंद्रीय योजनांचा आराखडा