OBC Reservation: '४५ दिवसांत १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्या'; गोवा सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | Hold Goa Panchayat Elections Within 45 Days Supreme Court Upholds Bombay HC Direction scsg 91 | Loksatta

OBC Reservation: ‘४५ दिवसांत १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्या’; गोवा सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राखत तीन दिवसांत राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याचे निर्देश दिले आहेत.

OBC Reservation: ‘४५ दिवसांत १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्या’; गोवा सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई उच्च न्यायलयाचा निर्णय कायम ठेवला (प्रातिनिधिक फोटो)

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाकडून गोव्यातील पंचायत निवडणुकासंदर्भात २८ जून २०२२ रोजी दिलेल्या निर्णयावर सुनावणी करण्यास नकार दिलाय. याच वेळेस न्यायालयाने गोवा सरकार आणि गोव्यातील राज्य निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायलयाने जारी केलेल्या आदेशानुसार आदेश निघाल्यापासून ४५ दिवसांमध्ये पंचायत निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत. न्यायालयाने सुरेश महाजन विरुद्ध मध्य प्रदेश या जुन्या प्रकरणाचा संदर्भ देत कलम २४५ ई च्या आधारे या प्रकरणी सुनावणी करण्यास नकार दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्या. दिनेश महेश्वरी आणि न्या. कृष्णा मुरारी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल देताना, “मुंबई उच्च न्यायलयाने गोव्यासंदर्भात जारी केलेल्या या आदेशामध्ये मध्यस्थी करण्यासारखं एकही कारण आम्हाला योग्य वाटतं नाहीत. हा निर्णय भारतीय संविधानातील कलम २४३ ई नुसार सविस्तर देण्यात आला आहे. तसेच न्यायालयाच्या सुरेश महाजन विरुद्ध मध्य प्रदेश राज्यासंदर्भातील निकालाप्रमाणेच निर्णय दिला गेलाय,” असं स्पष्ट केलं. मात्र त्याचवेळी न्यायालयाने गोवा निवडणूक आयोगाला गरज पडल्यास त्यांनी त्यांचे म्हणणे उच्च न्यायालयामध्ये मांडावे असंही सुचवलं आहे. उच्च न्यायालयाचे आदेश जारी झाल्यापासून ४५ दिवसांमध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्या निकालानुसार १० ऑगस्ट रोजी राज्यामध्ये पंचायत निवडणुका होणं अपेक्षित आहे.

उच्च न्यायालयाने नियम जिल्हा परिषद (निवडणूक कार्यपद्धती) नियम १९९६ मधील १० नियमानुसार उच्च न्यायालकडून देण्यात आलेल्या निर्देशांप्रमाणे तीन दिवसांत राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यास सांगितलं आहे. राज्य सरकारने ३० जून २०२२ रोजी यासंदर्भातील पत्रक जारी केलं असून त्यानुसार १० ऑगस्टपूर्वी निवडणुका पार पडणार आहेत, असं लाइव्ह लॉ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

नेमकं प्रकरण काय?
२७ डिसेंबर २०२१ रोजी गोवा राज्य निवडणूक आयोगाने सचिवांना (पंचायत) पत्र पाठवून ओबीसी आरक्षणासंदर्भातील आकडेवारीची मागणी केली. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने विकास किसनराव गवळी विरुद्ध महाराष्ट्र राज्य प्रकरणामध्ये दिलेल्या निकालाप्रमाणे ओबीसींसाठी स्थानिक पंचायत निवडणुकांमध्ये जागा राखीव ठेवण्याआधी चाचणी करण्याचे निर्देश पत्रात देण्यात आलेले. या निर्देशानुसार पंचायतीच्या निर्देशकांनी सामाजिक न्याय आणि गोवा सरकारच्या मागासवर्गीय समितीकडे पंचायतींमधील गावांत राहणाऱ्यांपैकी ओबीसींची संख्या किती आहे याबद्दलची आकडेवारी मागवली. २५ जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने याच माहितीसाठी आणखीन एक पत्र पाठवलं.

एससी, एसटी आणि ओबीसी समाजातील लोकसंख्येसंदर्भातील माहिती ३१ मार्च २०२२ पर्यंत पाठवावी असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले. त्यानंतर २८ मार्च रोजी निवडणूक आयोगाने पंचायतीच्या निर्देशकांना १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका २९ मे रोजी घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ही तारखी ४ जून करण्यात आली. यासंदर्भातील पत्र २० मे रोजी पाठवण्यात आलेलं. नंतर पुन्हा एकदा ही तारीख बदलून १८ जून करण्यात आली. मात्र गोवा सरकारने २६ मे रोजी मान्सूनचा पाऊस आणि एकंदरित पवासाची परिस्थिती पाहता दिलेल्या तारखेला निवडणूक घेणं शक्य होणार नाही असं सांगितलं. यासंदर्भातील माहिती त्यांनी निवडणूक आयोगालाही दिली. जून २०२२ मध्ये संदीप वाझरकर यांनी सरकारच्या या निर्णयाला आव्हान दिलं. त्यानंतर आणखीन एक याचिका दाखल झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Amarnath Yatra 2022: आजपासून अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू, ‘या’ कारणामुळे झाली होती स्थगित

संबंधित बातम्या

IFFI च्या ज्युरी प्रमुखांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला म्हटलं ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’; अनुपम खेर यांनी दिलं उत्तर, म्हणाले “असत्याची…”
NIA ची मोठी कारवाई! दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाबमध्ये २० ठिकाणी छापेमारी
“चीनप्रमाणे मुंबई-महाराष्ट्रातही…”; करोनादरम्यान राज्यात ‘ठाकरे सरकार’ सत्तेवर असल्याची आठवण करुन देत सेनेचा शिंदे गट, भाजपावर हल्लाबोल
अ‍ॅपलकडून ट्विटर अ‍ॅप हटवण्याची धमकी, एलॉन मस्क यांचा गंभीर आरोप
VIDEO: धक्कादायक! श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“मी तुला इतकाच सल्ला देईल की यापूर्वीही तू…”; ‘काश्मीर फाइल्स’ला अश्लील म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला इस्रायलच्या राजदूतानं झापलं
“सत्य हे फार…” विवेक अग्निहोत्री यांचं ‘द काश्मीर फाईल्स’ला व्हल्गर म्हणणाऱ्या ज्युरींना मोजक्या शब्दांत उत्तर
Video: मुलीच्या जन्मानंतर आलिया पहिल्यांदाच दिसली सार्वजनिक ठिकाणी, तिची अवस्था पाहून सर्वांनाच बसला धक्का
नायगाव-वरळी बीडीडीवासीयांसाठी खुशखबर; तब्बल ४६० रहिवाशांना म्हाडाच्या घराची हमी
FIFA WC 2022: “त्याच्या जागेवर इतरांना संधी…” नेमारच्या अनुपस्थित ब्राझीलने मिळवलेल्या विजयानंतर टिटेंनी केले कौतुक