देशातील प्राचीन भाषा संस्कृतविषयी एक नवी माहिती समोर आली आहे. भारतात संस्कृत केवळ २४ हजार ८२१ लोक बोलतात, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या जनगणना आयुक्त कार्यालयाच्या भाषा विभागाने दिली आहे. आग्र्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. देबाशिष भट्टाचार्य यांनी यासंदर्भात आरटीआय दाखल केली होती. देशातील बिहार, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात उर्दू बोलली आणि समजली जाते, असेही या आरटीआयच्या उत्तरात सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेसबूक आणि इन्स्टाग्राम वापरा तुमच्या आवडत्या भाषेत; या स्टेप्स वापरून लगेच करा बदल

भट्टाचार्य यांना आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, २०११ च्या जनगणनेनुसार केवळ ०.००२ टक्केच लोक संस्कृत बोलतात, असे समोर आले आहे. संस्कृत देशातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. संस्कृतला राज्यघटनेत अल्पसंख्याकांची भाषा म्हणून सूचीबद्ध केलेले नाही, असे भट्टाचार्य यांनी सांगितले आहे.

मोदी सरकारने PFI वर बंदी घातल्यानंतर ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा उल्लेख करत राम कदम म्हणाले, “आता देशात काँग्रेसचं…

२०१० मध्ये उत्तराखंडने संस्कृतला राज्याची दुसरी अधिकृत भाषा म्हणून घोषित केले होते. असा निर्णय घेणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य आहे. संस्कृत भारतात क्वचितच बोलली जाते. तर दुसरीकडे संस्कृतसह इतर भाषांचे मिश्रण असलेली हिंदी भारताच्या बहुतांश भागात बोलली जाते. केंद्रीय हिंदी संस्थेकडून (KHS) संस्कृतसोबतच ब्रज, अवधी, भोजपुरीसह अन्य १८ भाषांचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती या संस्थेच्या भाषातज्ज्ञ डॉ. सपना यांनी दिली आहे. यासाठी तीन शब्दकोश तयार करण्यात आले आहेत. १५ शब्दकोशांवर काम सुरू आहे, असे सपना यांनी सांगितले आहे.

“सर्वांना मिटवून टाका…” पीएफआयवरील बंदीनंतर अन्य एका संघटनेचा उल्लेख करत नितेश राणेंचं विधान

९ सप्टेंबर २०२२ मध्ये उत्तर प्रदेशच्या हमीरपूरच्या जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. चंद्रभुषण त्रिपाठी यांनी संस्कृत भाषेत एका प्रकरणात निकाल दिला होता, अशी माहिती ‘इंडिया टुडे’ वृत्त वाहिनीला सामाजिक कार्यकर्ते समीर यांनी दिली आहे. न्यायाधीशांच्या या कृतीनंतर संस्कृत भाषा पुन्हा चर्चेत आली होती. डॉ. चंद्रभुषण त्रिपाठी यांनी संस्कृतमध्ये पीएचडी केली आहे. लोप पावत चाललेली संस्कृत भाषा दैनंदिन व्यवहारात आणण्यासाठी त्रिपाठी प्रयत्न करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home ministrys language department revealed that only 24821 people speaks sanskrit in india rvs
First published on: 28-09-2022 at 09:51 IST