भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बांदा हे गेल्या २४ तासांत ४७ अंश सेल्सिअस तापमानासह सर्वात उष्ण असणारे शहर ठरले आहे. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या हवामान बुलेटिनमध्ये, मेटने ४४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असलेली शहरं सूचीबद्ध केली आहेत. यातील बहुतांश ठिकाणे राजस्थान, पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, तेलंगणा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ, सौराष्ट्र-कच्छ आणि गुजरात विभाग, पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, तसेच ओडिशा इथली आहेत.

२९ एप्रिल रोजी भारतातील सर्वात तापमान असलेली शहरं

  • बांदा (उत्तर प्रदेश): ४७.४° से
  • प्रयागराज (उत्तर प्रदेश): ४६.८ अंश से
  • श्रीगंगानगर (राजस्थान), चंद्रपूर (महाराष्ट्र): ४६.४° से
  • नौगोंग (एमपी), झांसी (उत्तर प्रदेश): ४६.२° से
  • नजफगढ आणि पीतमपुरा (दिल्ली), गुरुग्राम (हरियाणा): ४५.९° से.
  • डाल्टनगंज (झारखंड), रिज (दिल्ली): ४५.७° से

(हे ही वाचा: Photos: ‘ही’ पाच देसी पेय तुम्हाला उन्हाळ्यात करतील रिफ्रेश!)

Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?
heatwave in loksabha election
मतदानावर होणार उष्णतेच्या लाटेचा परिणाम? हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, संपूर्ण भारतातील एप्रिलमध्ये सरासरी तापमान ३५.०५ अंश होते, जे १२२ वर्षांतील चौथ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान होते.