LPG Gas E KYC online: देशातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांना त्यांचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण करणे आवश्यक आहे, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की गॅस ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीचे मोबाइल अॅप आणि आधार फेसआरडी अॅप वापरून घरबसल्या पडताळणी पूर्ण करता येते. त्यामुळे ग्राहकांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी दोन अॅपचा वापर करावा लागणार आहे. ई-केवायसी कशी करायची याची माहिती बातमीत सविस्तर देण्यात आली आहे.

ई-केवायसी पूर्ण करावी लागणार

सरकारने एलपीजी ग्राहकांना त्यांच्या एलपीजी वितरकाशी संपर्क साधण्याचा सल्ला देऊन मदतीसाठी टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. मध्य पूर्वेतील सध्याच्या परिस्थितीमुळे भारतातील शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरचा पुरवठा तुटवडा असताना हे ई-केवायसी पूर्ण करावी लागणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील संघर्षामुळे होर्मुझच्या महत्त्वाच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक थांबली आहे. आता यातील दोन जहाजांनी भारतात येण्याची परवानगी मिळाली आहे.

गॅसच्या किंमती वाढल्या

दिल्लीमध्ये सध्या १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ८५३ रुपयांवरून ९१३ रुपयांवर पोहोचली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरच्या किमती ११५ रुपयांनी वाढून १,८८४.५० रुपयांवर पोहोचल्या आहेत (१९ किलोच्या सिलिंडरसाठी). तर दुसरीकडे एलपीजी गॅस सिलिंडरच्या काळ्या बाजारात

Steps for LPG Gas Online e-KYC: ‘एलपीजी ई-केवायसी’ कशी पूर्ण करावी?

  • यासाठी एलपीजी ग्राहकांना https://www.pmuy.gov.in/e-kyc.html या लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • येथे, ज्या तेल कंपनीचा सिलिंडर ते वापरत आहेत त्यांचे अॅप डाउनलोड करा.
  • इंडियन ऑइलला IndianOil ONE, एचपी गॅससाठी HP PAY आणि भारत पेट्रोलियमसाठी HelloBPCL for Business आवश्यक आहे.
  • अॅपवर एलपीजी नोंदणीकृत मोबाइल नंबर एंटर करा आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
  • यासाठी, तुम्हाला Aadhaar FaceRD अ‍ॅप देखील डाउनलोड करावे लागेल.
  • तुमचे एलपीजी ई-केवायसी दोन्ही अ‍ॅप्स वापरून पूर्ण केले जाईल. अ‍ॅप तुमच्या फोनचा कॅमेरा चालू करेल आणि तुमचा चेहरा स्कॅन करेल.
  • पडताळणी पूर्ण होताच, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर LPG e-KYC पूर्ण झाल्याचे सूचित केले जाईल.

सिलिंडर डेपोमध्ये चोवीस तास कर्मचारी तैनात

बाजारातील एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने साठेबाजीचे अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कर्नाटकातील केंगेरी भागात, पोलिसांनी एका ३० वर्षीय व्यक्तीला विविध ब्रँडचे एलपीजी सिलिंडर चढ्या दराने विकण्यासाठी साठवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. दिल्लीमध्ये, पोलिसांनी सर्व नियमित सुट्ट्या रद्द केल्या आहेत आणि साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी सिलिंडर डेपोमध्ये चोवीस तास कर्मचारी तैनात केले आहेत.