American student in India job advice: भारतात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. विदेशात नोकरी मिळवण्यासाठी काय करावं लागेल? याची माहिती तो विचारत आहे. विशेष म्हणजे हा विद्यार्थी मूळचा अमेरिकन असून, भारतातच वास्तव्यास आहे. त्याचं सर्व शिक्षण देखील भारतातच झालं अशी माहिती त्याने पोस्टमधून दिली आहे.
रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आस्क एनआरआय या सबरेडिटवर विद्यार्थ्याने याबाबत पोस्ट केली आहे. रेडिट या सोशल प्लॅटफॉर्मवर ओळख गोपनीय ठेवून मत मांडता येतात. तरुणांमध्ये हा प्लॅटफॉर्म खूप प्रसिद्ध आहे.
काय आहे पोस्ट?
“मी एक अमेरिकन आहे. पण, मी लहानपणापासून भारतातच राहतोय. सध्या बंगळुरुत कॉमप्युटर सायन्स विषयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. पदवी पूर्ण झाल्यानंतर करिअरच्या कोणत्या संधी असतील याचा विचार करत आहे. माझं सर्व शिक्षण भारतात झालं आहे. आणि भारतात कागदपत्रं, भरती प्रक्रिया थोडी अडचणीची आहे असं मला वाटतं (नक्की कल्पना नाही) यावरुन माझा गोंधळ उडाला आहे”, असे या तरुणाने पोस्टमध्ये म्हटले आहे.
अर्ज कसा करावा?
“एनआयआर किंवा अमेरिकाबाहेर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी परदेशात नोकरी कशी शोधावी (अमेरिका, युरोप अथवा इतर कुठे) भारतातून अर्ज करता येईल? का इंटर्नशीप मार्फत अर्ज करावा? माहिती मिळाली तर मदत होईल”, असे या तरुणाने पुढे पोस्टमध्ये म्हटले आहे.
नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या?
“अमेरिकन नागरिकांना नोकरी शोधण्यासाठी वेगळं काही असं संकेतस्थळ नाही. अमेरिकन कंपन्या भारतातून इंटर्न घेत नाहीत. पगार, स्थलांतर आणि इतर खर्च यांचा विचार करता कंपनीला ते परवडणारे नाही. कोणत्याही जॉबसाठी अर्ज करतो त्याचप्रमाणे यासाठी अर्ज करता येतो. मास्टरसाठी अमेरिकेत जाऊन पुढे वेगळाही निर्णय घेता येऊ शकतो”, असे एका नेटकऱ्यांनी तरुणाला सल्ला दिला आहे.

भारतात नोकरी शोधण्याचा सल्ला
“काही नेटकऱ्यांनी तरुणाला भारतातच नोकरी शोधण्याचा सल्ला दिला. भारतात नोकरी सुरु केल्यानंतर एक किंवा दोन वर्षानंतर अमेरिकेत नोकरीची संधी शोधता येईल. यावेळी पहिल्या नोकरीतील अनुभवाचा फायदाही होईल. फ्रेशर्सना संधी देणाऱ्या नोकऱ्यांची संख्या अमेरिकेत कमी होत आहे. एआय क्रांतीचाही फटका बसतोय”, असे आणखी एका नेटकऱ्याने मत व्यत केले आहे.
“तू भारतात सध्या बी.टेक करत असशील तर, मास्टर करण्यासाठी अमेरिकेत जा. युएसमध्ये मास्टर पूर्ण झालं की लगेच जॉब मिळेल”, असा दुसऱ्या एका नेटकऱ्याने दिला आहे.
