Humayun Kabir : पश्चिम बंगालमध्ये नवी बाबरी मशीद उभारणार असल्याची घोषणा तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायूँ कबीर यांनी केली आहे. मुर्शिदाबाद या ठिकाणी असलेल्या बेलडांगा या ठिकाणी बाबरी मशीद बांधली जाईल. ६ डिसेंबर २०२५ च्या आधी बेलडांगा या ठिकाणी बाबरी मशीद बांधण्याचं काम सुरु केलं जाईल अशी घोषणा हूमायूँ कबीर ( Humayun Kabir ) यांनी केली आहे.

काय म्हणाले हूमायूँ कबीर?

“पश्चिम बंगालमध्ये ३४ टक्के मुस्लीम आहेत. त्यांना मान उंच करुन चालण्याची इच्छा आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मी यासाठीच एक प्रस्ताव ठेवतो आहे. त्यासाठी पैशांची कुठलीही कमतरता होणार नाही. बेलडांगामध्ये जेवढे मदरसे आहेत ते मदरसे आणि बहरामपूर भागातले मदरसे यांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या १०० हून अधिक लोकांची बाबरी मशीद ट्रस्ट तयार केली जाईल. यानंतर ६ डिसेंबर २०२५ च्या आधी बेलडांगा भागातल्या दोन एकर जमिनीवर बाबरी मशीद उभारली जाईल किंवा त्याचं काम तरी सुरु केलं जाईल.” असं हूमायूँ कबीर ( Humayun Kabir ) यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे
Ramsar Conservation Court Public Interest Litigation filed by High Court
रामसर संवर्धन न्यायालयाकडे; उच्च न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”

बाबरी मशीद बांधण्यासाठी १ कोटी रुपये देणार

कबीर पुढे म्हणाले, मुस्लीम माणसाला मान उंचावून चालण्याचा अधिकार आहे. जी बाबरी मशीद पाडण्यात आली तीच मशीद बेलडांगामध्ये उभारण्यात येईल. या मशिदीसाठी मी १ कोटी रुपये दान देणार आहे. ६ डिसेंबर २०२५ पूर्वी बेलडांगा या ठिकाणी बाबरी मशीद उभारणीचं काम सुरु केलं जाईल. असं हुमायूँ कबीर ( Humayun Kabir ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Sharad Pawar : ‘ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता’; शरद पवारांचं मोठं विधान

हूमायूँ कबीर हे भरपतूरचे आमदार

हूमायूँ कबीर हे मुस्लिम बहुल भाग असलेल्या मुर्शिदाबादच्या भरतपूर विधानसभा मतदारसंघातले आमदार आहेत. ममता बॅनर्जींच्या आधीच्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते. त्यांनी २०११ मध्ये पहिल्यांदा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. हुमायूँ कबीर यांचं एक वक्तव्य वादग्रस्त ठरलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की जर जिंकलो तर त्यानंतरच्या पुढच्या दोन तासांत भाजपा समर्थकांना कापून नदीमध्ये फेकून देऊ. आता याच आमदाराने बाबरी मशीद उभारण्याची घोषणा केली आहे.

अयोध्येत असलेली बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यानंतर बराच काळ संघर्ष चालला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. निकालानंतर या जमिनीचा फैसला झाला. अयोध्येत आता राम मंदिरही उभं राहिलं आहे. पुढच्या महिन्यात राम मंदिराला एक वर्ष पूर्ण होईल. त्याआधीच तृणमूलच्या आमदाराने पश्चिम बंगालमध्ये राम मंदिर उभारलं जाणार असं म्हटलं आहे.

Story img Loader