Muzaffarpur : देशभरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. लैंगिक अत्याचार, हिंसा, गोळीबार, जाळपोळ, खून, प्रेमसंबंधाच्या संशयावरून हत्या अशा अनेक घटना देशातील विविध शहरांत घडल्याच्या बातम्या रोज समोर येतात. आता बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा अतिशय क्रूर पद्धतीने छळ करत पत्नीला दोन दिवस खोलीत कोंडून ठेवत पत्नीच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं घटना काय घडली?

मुझफ्फरपूर जिल्ह्यातील पारू परिसरात माणुसकीला लाजवेल असा प्रकार घडल्याची माहिती समोर आली. एका पतीने पत्नीवर विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून क्रूरपणे अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पतीने पत्नीला दोन दिवस खोलीत कोंडून ठेवलं असून पतीने तिच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. तसेच गरम इस्त्रीने तिच्या पायांना चटके दिल्याचाही आरोप या महिलेने केला आहे. ही घटना १३ जून रोजी मुझफ्फरपूर जिल्ह्यात घडली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, पतीने तिला दोन दिवस अन्न आणि पाणी न देता एका खोलीत कोंडून ठेवलं होतं. तिने आरोप केला की तिचा पती शत्रुघ्न (४०) याने तिला वीजेचा शॉक देण्याचा देखील प्रयत्न केला. या महिलेने सांगितलं की, मी ओरडल्यानंतरही माझ्या मदतीला कोणीही आलं नाही. १५ जून रोजी तिचा भाऊ तिच्या घरी आल्यानंतर त्याने मदत केल्याने आपण वाचवल्याचं या महिलेचं म्हणणं आहे.

या महिलेल्या सुरुवातीला पारू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, तिला गंभीर दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, १६ जून रोजी संबंधित महिलेने तिचा पती, सासू आणि मेहुणा आणि मेहुणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या पतीला अटक केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठ पोलीस अधिकारी राम विनय कुमार यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “हा खटला अत्यंत गंभीर आहे. घरगुती हिंसाचार आणि शारीरिक हल्ल्याशी संबंधित कलम या गुन्ह्यात लावण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आले आहेत. या महिलेने म्हटलं की, “काही दिवसांपूर्वी पती आणि पतीच्या कुटुंबाने विश्वासघाताचा आरोप केला. माझे पती माझ्यावर संशय घेत होते. जेव्हा मी माझं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय चाचणी करण्याचं म्हटलं, तेव्हा त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली.”