scorecardresearch

मित्रांबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी पतीची बळजबरी! Sex Video शूट करुन ब्लॅकमेलिंग; घरातील कुड्यांमध्ये लावलेली गांजाची रोपटी

मेहुणीलाही शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्याचाही उल्लेख पोलिसांकडे केलेल्या लेखी तक्रारीमध्ये

मित्रांबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी पतीची बळजबरी! Sex Video शूट करुन ब्लॅकमेलिंग; घरातील कुड्यांमध्ये लावलेली गांजाची रोपटी
महिलेने लेखी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांची कारवाई (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Sex video crime in Bangaluru: बंगळुरुमधील एका सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेने तिच्या पतीविरोधात धक्कादायक आरोप केले आहेत. माहिती तंत्रज्ञान विषयातील तज्ज्ञ असलेल्या आपलेल्या पतीने त्याच्या मित्रांबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी आपल्याला भाग पाडल्याचं या महिलेने म्हटलं आहे. या प्रकरणामुळे केवळ एका विशिष्ट वर्गातील महिलांचेच षोषण केले जात नाही तर सुशिक्षित आणि उच्चशिक्षित महिलांनाही विचित्र प्रकारच्या घरगुती हिंचाचाराचा सामाना करावा लागतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपल्या मित्रांबरोबर पत्नीला शरीरसंबंध ठेवण्याची बळजबरी केल्यानंतर त्यांचे शरीरसंबंध ठेवतानाचे व्हिडीओ काढून त्या व्हिडीओंच्या आधारे या आरोपीने पत्नीला ब्लॅकमेल केल्याचंही आरोपांमध्ये म्हटलं आहे.

थानिसांद्रा मेन रोडवरील सम्पीगेहल्ली येथील ३४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनियर माहिलेने हे धक्कादायक आरोप केले आहेत. या महिलेने लेखी तक्रार दिल्यानंतर तिच्या ३६ वर्षीय पतीला पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे. इतर पुरुषांबरोबर झोपण्यासाठी, त्यांच्याबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी नकार दिल्यास पती आपल्याला मारहाण करायचा असंही या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. या महिलेच्या आरोपी पतीने तिला मित्रांबरोबर शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं. पत्नी मित्रांबरोबर शरीरसंबंध ठेवत असल्याचे व्हिडीओ या व्यक्तीने मोबाईलवरुन शूट केले.

या जाचाला कंटाळून पत्नीने घटस्फोटाची मागणी केली असता या व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०११ रोजी या दोघांनी लग्न केलं असून दोघांना एक मुलगाही आहे. सम्पीगेहल्ली पोलिसांनी दाखल करुन घेतलेल्या तक्रारीमध्ये आरोपी पतीला दारुचं आणि अंमली पदार्थांचं व्यसन आहे. केवळ आपल्या पत्नीलाच नाही तर मेहुणीलाही या व्यक्तीने त्रास दिल्याचा दावा त्याच्या पत्नीने केला आहे. आपल्याबरोबर शरीरसंबंध ठेवावेत यासाठी या व्यक्तीने मेहुणीला ब्लॅकमेल करुन तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवले होते, असा आरोपही या महिलेने केला आहे.

नक्की पाहा >> श्रद्धा हत्याकांडावरील Instagram Reel पाहून संतापाची लाट! लोक म्हणाली, “याला वेड्यांच्या इस्पितळात पाठवा”; पाहा Viral रील

दारुच्या नशेत पती मला बेदम मारहाण करायचा असंही या महिलेने म्हटलं आहे. घरातील परिस्थिती दिवसोंदिवस बिघडत असल्याचं लक्षात आल्यानंतर या महिलेने घटस्फोट घेण्याचं ठरवलं तर आरोपी तिच्यावर नाराज झाला. त्याने पत्नीचे सर्व व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोज करण्याची धमकी दिली. पतीला गांजाचं सेवन करण्याचं व्यसन असल्याचही या महिलेने म्हटलं आहे. घरातील कुंडीमध्येच त्याने गांजाची दोन रोपं लावली आहेत असंही या महिलने म्हटलं आहे. पोलिसांनी या कुंड्याही ताब्यात घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 10:16 IST

संबंधित बातम्या