UP Murder: ड्रग्जच्या आहारी गेलेल्या पत्नीचा निर्घृण खून, मृतदेहाचे केले तुकडे, उत्तर प्रदेशच्या सीतापूरमधील थरारक घटनाHusband killed drug addict wife in Sitapur Uttar Pradesh arrested by police | Loksatta

UP Murder: ड्रग्जच्या आहारी गेलेल्या पत्नीचा निर्घृण खून; मृतदेहाचे केले तुकडे, उत्तर प्रदेशच्या सीतापूरमधील थरारक घटना

पत्नी दुसऱ्या व्यक्तीकडे राहत असल्याच्या रागातून खून केल्याची कबुली आरोपी पतीने दिली आहे

crime news
(संग्रहित छायाचित्र)

दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरण देशात गाजत असताना उत्तर प्रदेशातील सीतापूरमधून असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. पंकज मौर्या नावाच्या व्यक्तीने पत्नीचा खून करून मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. अन्य एका साथीदाराच्या मदतीने आरोपीने पत्नीला निर्घृणपणे संपवलं आहे. सीतापूर पोलिसांना ८ नोव्हेंबरला गुलारिहा भागातून पीडित ज्योतीच्या मृतदेहाचे अवयव आढळून आल्यानंतर या गुन्ह्याचा खुलासा झाला आहे.

Shraddha Walker murder case: आफताबविरोधात आधी तक्रार, नंतर माघार; दोन वर्षांपूर्वीचे श्रद्धाने पोलिसांना दिलेली पत्रे उजेडात

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती पंकज मोर्यासह त्याचा साथीदार दुर्जन पारसी याला अटक केली आहे. “ड्रग्जच्या आहारी गेलेली आपली पत्नी दुसऱ्या व्यक्तीकडे अनेक दिवसांपासून राहत होती. त्यामुळे नात्यात कटूता निर्माण झाली होती” अशी माहिती आरोपी पतीने पोलिसांना दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. पत्नी फसवणूक करत असल्याचा संशय आल्यानंतर आरोपी पतीने खुनाची योजना आखली होती, असे सीतापूर पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे. या दाम्पत्याच्या लग्नाला दहा वर्षांहून अधिक काळ लोटला होता.

Shraddha Murder Case: “…तर कदाचित श्रद्धाचा जीव वाचला असता”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

वसईच्या श्रद्धाचा तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालाने दिल्लीत खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करत दिल्लीलगत असलेल्या जंगलात फेकून दिले. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असतानाच अशाच पद्धतीने इतर काही महिलांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये एका व्यक्तीने पत्नीचा खून करुन तिचे दोन तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पत्नीला संपवल्यानंतर तिच्या अवयवाचे तुकडे आरोपीने जंगलातील विविध भागांमध्ये पुरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. दरम्यान, पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचा खून करून तिच्या शरिराचे सहा तुकडे केल्याची थरारक घटनाही उत्तर प्रदेशातील आजमगढमध्ये काही दिवसांआधी घडली होती. पीडित महिलेचा खून करून तिचे अवयव विहिरीत टाकल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2022 at 09:38 IST
Next Story
“१९७१ चं बांगलादेश युद्ध हे लष्करी अपयश नाही तर…”; भारताच्या माणेकशा यांचा उल्लेख करत पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचं विधान