Crime News : पती आणि पत्नी यांच्यातील वादाचे एक विचित्र प्रकरण नुकतेच समोर आले आहे, उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे एका महिला तिच्या पतीला वारंवार दाढी काढण्यास सांगत होती, मात्र पती तिचं ऐकत नव्हता. अखेर कंटाळून ही महिला तिच्या दीराबरोबर पळून गेल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

मेरठच्या उज्ज्वल गार्डन कॉलनीत राहणारा मुस्लिम धर्मगुरू शकीर याचे लग्न सात महिन्यांपूर्वीच अर्शीशी झाले होते. शकीरने दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर लगेचच त्याची पत्नी त्याला त्याच्यावर दाढी काढण्यासाठी दबाव टाकू लागली. आर्शीने स्पष्ट सांगितलं होतं की तीने कुटुंबियांचा दबावामुळे शकीर याच्याशी लग्न केले होते आणि जर तो दाढी काढायला तयार झाला तरच ती त्याच्याबरोबर राहील. या मुद्द्यावर जोडप्यामध्ये सतत वाद होत होते. शकीरने त्याच्या पत्नीच्या कुटुंबियांना देखील याबद्दल माहिती दिली होती.

पण काळात अर्शीचे शाकीरच्या धाकट्या भावासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. अखेर ३ फेब्रुवारी रोजी दोघे पळून गेले. यामुळे शाकीर आणि त्याच्या कुटुंबाला चांगलाच धक्का बसला. सामाजात हसू होऊ नये म्हणून शकीरने त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्याला सापडले नाहीत.

त्यानंतर त्याने पत्नी आणि भाऊ हरवल्याची तक्रार दाखल केली तसेच आर्शीच्या कुटुंबियांना देखील याबद्दल माहिती दिली, मात्र तिच्या कुटुंबियांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि आपण तिच्याशी सर्व संबंध तोडून टाकल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान शकीरने त्याची पळून गेलेली पत्नी त्याच्याकडे पाच लाख रुपये मागत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान पोलिस अधीक्षक (एसपी) आयुष विक्रम यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणात योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले आहेत.