…म्हणून नवऱ्याने पत्नीचा न्यूड व्हिडिओ केला अपलोड

एका २६ वर्षीय विवाहित महिलेने नवरा, सासू-सासरे आणि दीरावर तिचे न्यूड फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

एका २६ वर्षीय विवाहित महिलेने नवरा, सासू-सासरे आणि दीरावर तिचे न्यूड फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवऱ्याला नपुंसकतेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्यांनी आपले सोशल मीडिया अकाऊंट हॅक केले व त्यावर आपले न्यूड फोटो, व्हिडिओ अपलोड केले. सोशल मीडियावर त्यांनी आपण शरीर विक्रिय करणारी महिला असल्याचा प्रचार केला असा आरोपही या महिलेने केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

पीडित महिला बंगळुरु येथे राहणारी आहे. पीडित महिला आता आपल्या आई-वडिलांकडे राहत असून तिने शनिवारी पोलीस स्थानक गाठून तक्रार दाखल केली. आरोपींनी अपलोड केलेले फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पोलिसांनी सायबर क्राईम सेलच्या तज्ञांशी संपर्क साधला. अद्यापपर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्याचे आमचे मुख्य लक्ष्य आहे असे पोलिसांनी सांगितले.

पीडित महिलेचा ऑक्टोंबर २०१७ मध्ये बीटीएम लेआऊट येथे रहाणाऱ्या व्यक्तीबरोबर विवाह झाला. शहरातील महागडया हॉलमध्ये आमचा विवाह पार पडला. वडिलांनी लग्नाच्या दिवशी ३० लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च केली होती असा दावा या महिलेने केला. लग्नाच्या पहिल्या रात्रीच या महिलेला तिचा नवरा नपुंसक असल्याचे समजल्यानंतर धक्का बसला. त्याच्या घरच्यांनी ही बाब लपवून माझे आयुष्य उद्धवस्त केले. लग्नानंतरचा प्रत्येक दिवस मला मानसिक छळ सहन करावा लागला असे या महिलेने सांगितले.

नवऱ्याने आपल्यावर दुसऱ्या पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्याचा आग्रह धरल्यानंतर आपल्याला जबर धक्का बसला असा आरोप या महिलेने केला. नवऱ्याला नपुंसकतेच्या शस्त्रक्रियेसाठी पैसा देण्यासाठी त्याच्या घरचे माझ्यावर दबाव टाकत होते. मला २५ लाख रुपयांची व्यवस्था करायला सांगत होते. ज्याला मी नकार दिला. त्यादिवसापासून त्यांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली.

मला जेवणातून झोपेच्या गोळया देण्यात आल्या. मी गाढ झोपेत असताना मला विवस्त्र करुन माझे फोटो काढले आणि न्यूड व्हिडिओ बनवले. माझे फेसबुक अकाऊंट हॅक करुन त्यावर त्यांनी हे फोटो, व्हिडिओ अपलोड केले असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Husbund uploaded my nude videos for not funding his impotency wife allegation

ताज्या बातम्या