देशात रामनवमीच्या शोभायात्रेत ठिकाठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. अशातच हैदराबादमध्येही दोन गटात हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. नमाज पठण सुरू असताना एक गट मशिदीबाहेर शांतात भंग करत होता. तेव्हा, दोन गट समोरासमोर आले. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी ( ३० मार्च ) ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. रामानवमीच्या पार्श्वभूमीवर शोभायात्रा निघाली होती. त्यावेळी चारमिनार परिसरात असलेल्या मशिदीजवळ एक गट दुचाकीवरून स्टंटबाजी करत शांतता भंग करण्याचं काम करत होते. तेव्हा दोन गटांत जोरदार हाणामारी झाली.

हेही वाचा : “पाकिस्तानी लोकांना वाटतं फाळणी ही मोठी चूक होती”, मोहन भागवत यांचं वक्तव्य; म्हणाले, “भारताने पाकिस्तानवर आक्रमण…”

याप्रकरणावर चारमिनार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, “पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही.” ‘एबीपी न्यूज’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

हेही वाचा : प. बंगालमध्ये तणाव कायम, पोलिसांवर दगडफेक; तीन जखमी

भाजपा आमदार टी राजा सिंह यांचं वादग्रस्त विधान

तेलंगाणा भाजपाचे निलंबित आमदार टी राज सिंह यांनी हैदराबाद येथे रामनवमी निमित्त शोभायात्रा काढली होती. तेव्हा त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. “भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी ‘हम दो आणि हमारे दो’ यांनाच मतदानाचा अधिकार आहे. ‘हम पांच आणि हमारे पचास’ यांना मतदानाचा अधिकार नसणार आहे,” असं टी राजा यांनी म्हटलं होतं.

देशात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना

३० आणि ३१ मार्चला देशात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहे. पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रात हिंसाचाराच्या घटना घडल्या. यात दगडफेक, हाणामारी आणि दगडफेक झाली आहे. या घटनेत अनेक लोक गंभीररित्या जखमीही झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyderabad charminar face off violence between two groups after bike stunts ssa
First published on: 01-04-2023 at 12:57 IST