scorecardresearch

Premium

इसिसमध्ये सामील झालेल्या हैदराबादच्या अभियांत्रिकी पदवीधर तरुणाचा मृत्यू

इसिस या दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या हैदराबाद येथील भारतीय तरुणाचा सीरियात एका युद्धादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

इसिसमध्ये सामील झालेल्या हैदराबादच्या अभियांत्रिकी पदवीधर तरुणाचा मृत्यू

इसिस या दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या हैदराबाद येथील भारतीय तरुणाचा सीरियात एका युद्धादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. मोहद हनीफ वसीम हा २७ वर्षीय अभियांत्रिकीची पदवी ग्रहण केलेला युवक फेब्रुवारी महिन्यात इसिस या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर तेलंगणा पोलीसांनी हनीफच्या इसिसमध्ये सामील होण्यासंबंधीची आणखी माहिती मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते. तसेच हनीफ सीरियात कसा दाखल झाला याचाही शोध घेतला जात आहे. हनीफने हैदराबादमधून अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण चार वर्षांपूर्वीच पूर्ण केले होते. यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी तो लंडनमध्ये गेला होता. तेथूनच तो फेब्रुवारी महिन्यात सीरियासाठी रवाना झाल्याचे समजते. सीरियात दाखल झाल्यानंतर इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात तो आला आणि एका युद्धा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती हनीफच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.
गुप्तचर विभागाच्या अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, हनीफचा सीरियामध्ये झालेला मृत्यू युद्धादरम्यान झाला की अपघाताने झाला याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण, मार्च महिन्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आणि हीच माहिती त्याचा कुटुंबियांनाही देण्यात आली आहे. मूळचे तेलंगणातील हे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून हैदराबादमध्ये वास्तव्याला येऊन कायमस्वरुपी स्थिर झाले. हनीफचा मृत्यू झाल्याचा अरबी भाषेतील एसएमएस कुटुंबियांच्या मोबाईलवर आला होता. सोशल मीडियातून आकर्षित होऊन हनीफ इसिसमध्ये दाखल झाल्याची शक्यता असल्याचेही अधिकऱयांचे म्हणणे आहे.

Mohammad shehanawaz
पुण्यातून पळून गेलेल्या ISIS संशयित दहशतवाद्याला दिल्लीत अटक, पोलिसांची मोठी कारवाई
youth murder in Dadar East
मुंबई : दादर पूर्व येथे २७ वर्षीय तरुणाची हत्या
dv bill blayer
भारताच्या व्हिसाबंदी निर्णयामुळे कॅनडाला चिंता; निज्जर हत्या प्रकरण
canadian pm justin trudeau reiterated allegations on india in killing of khalistani leader
भारताच्या ‘व्हिसाबंदी’नंतरही कॅनडाची ताठर भूमिका; खलिस्तानवादी नेत्याचे हत्याप्रकरण गांभीर्याने घ्यावे : ट्रुडो  

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hyderabad engineering graduate who joined islamic state dies in syria

First published on: 05-05-2015 at 02:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×