हैदराबातमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, १८ जणांना अटक; तब्बल १४०० महिलांची तस्करी केल्याचा आरोप! | hyderabad human trafficking sex racket police arrested 18 accused | Loksatta

हैदराबादमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, १८ जणांना अटक; तब्बल १४०० महिलांची तस्करी केल्याचा आरोप!

महिलांना देहविक्री व्यवसायात ढकलणाऱ्या मोठ्या रॅकेटचा हैदराबात पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

हैदराबादमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, १८ जणांना अटक; तब्बल १४०० महिलांची तस्करी केल्याचा आरोप!
सांकेतिक फोटो

महिला आणि मुलींची तस्करी करणाऱ्या तसेच त्यांना देहविक्री व्यवसायात ढकलणाऱ्या मोठ्या रॅकेटचा हैदराबात पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १८ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मागील काही वर्षांत तब्बल १४०० मुली, महिलांना देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात सायबराबाद आणि हैदराबादच्या हद्दीत ३९ वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा >> VIDEO: भाषण करताना स्टुलवर उभे राहिल्याने मनसेची टीका, सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या, “माझ्या पायाखाली…”

हैदरबाद पोलिसांनी १८ आरोपींना वेगवेगळ्या राज्यांतून अटक केली आहे. आरोपींनी आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, दिल्ली, मुंबई, कोलकाता, आसाम या राज्यांसह बांगलादेश, नेपाळ, थायलंड, उझबेकिस्तान, रशिया या देशांमधूनही मुली, महिलांची तस्करी केली आहे. आरोपी महिलांची वेबसाईटच्या माध्यमातून जाहिरात करायचे. तसेच कॉल सेंटर, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ते ग्राहकांशी संपर्क साधायचे. हैदराबाद आणि सायबराबाद या भागातील तस्करीच्या जवळपास ७० टक्के गुन्ह्यांत अटक करण्यात आलेले आरोपी सामील आहेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. महिलांना देहविक्री व्यवसायात ढकलण्यासाठी आरोपी दिल्ली, बंगळुरू, हैदरबाद येथून एक कॉल सेंटरही चालवायचे.

हेही वाचा >> “…तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात असेल”, शरद पवारांच्या अल्टिमेटमनंतर रोहित पवार आक्रमक; सीमाप्रश्नी राज्य सरकारवर गंभीर आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींनी आतापर्यंत १४१९० महिला आणि तरुणींची तस्करी करून त्यांना देहविक्री व्यवसायात ढकलले आहे. त्यासाठी महिलांना आलिशान जीवनशैली, सहज मिळणारे पैसे, नोकरी यांचे आमिष दाखवले जायचे. पोलीस या प्रकरणात अटक केलेल्या १८ आरोपींची चौकशी करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 09:03 IST
Next Story
सीमावाद चिघळला: “आमच्या दोघांचंही एकमत झालं आहे की…”; महाराष्ट्रातील ट्रकवरील हल्ल्यानंतर शिंदे-बोम्मईंची फोनवरुन चर्चा