Hyderabad : चोरीच्या अनेक घटना दररोज समोर येतात. कधी चोरटे घरफोडी करतात तर कधी एटीएममशीन फोडून चोरी केल्याच्या घटना समोर येतात. चोरटे कधी ऑनलाईन फसवणूक करत चोरी करतात तर कधी दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांची चोरी करतात. अशा वेगवेगळ्या चोरीच्या घटना पाहायला मिळतात. आता अशा घटना घडल्यानंतर चोरटे पोलिसांपासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल देखील करताना पाहायला मिळातात. आता अशीच एक अनोखी चोरीची घटना समोर आली आहे. हैदराबादमध्ये एक अशी घटना घडली जी एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नाही.

हैदराबादमधील हयातनगरमधून चोरट्याने रुग्णवाहिका चोरली आणि विजयवाड्याच्या दिशेने पळ काढला. एवढंच नाही तर या चोरट्यांनी रुग्णवाहिकेचा सायरन वाजवून ट्राफीकपासून वाचण्याचा प्रयत्न करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना पकडण्यास यश आलं. पोलिसांनी या चोरट्यांचा पाठलाग करत चोरट्यांना बेड्या ठोकल्या.

Dombivli citizen theft caught loksatta
डोंबिवलीत चोरी करत असताना चोरट्याला नागरिकांनी पकडले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Theft , Achole police, Vasai , Vasai strange case,
खरा चोर कोण….? एका विचित्र चोरीचा नाट्यमय तपास
bike thieves arrested loksatta news
कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीत मोटार सायकल चोरणारे उल्हासनगरमधून अटक
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
mumbai police chief vivek phansalkar news in marathi
मुंबईतील वित्तीय, गुंतवणूक संस्थांची माहिती गोळा करा; मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे आदेश
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
thane palghar gold chain snatcher loksatta news
ठाणे, पालघरमध्ये सोनसाखळ्या चोरणारे गुजरातचे दोन सराईत चोरटे अटकेत, २० गुन्हे केल्याची चोरट्यांची कबुली

हेही वाचा : हरवलेला मुलगा ३० वर्षांनी घरी परतला; आईनं प्रेमानं खाऊ घातलं, पण अखेर बिंग फुटताच बसला आश्चर्याचा धक्का

पोलिसांनी रुग्णवाहिकेचा हयातनगरपासून ते थेट सूर्यापेट जिल्ह्यापर्यंत पाठलाग केला. मात्र, याच दरम्यान, चोरांनी आपल्या चतुराईने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर पोलिसांपासून वाचण्यासाठी पळून जात असतांना चोरट्यांनी एका टोलनाक्याचे गेटही तोडले. मात्र, सूर्यापेट जिल्ह्यात पोलिसांनी मोठ्या चतुराईने ट्रक रस्त्यावर उभ्या करून त्याचा मार्ग अडवला आणि नंतर चोरट्यांना पकडले.

यानंतर या चोरट्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. दरम्यान, पोलिसांनी चोरट्यांना पकडल्यानंतर प्राथमिक चौकशी केली असता आरोपी हे गुन्हेगार असून यापूर्वीही अनेक चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आता पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

Story img Loader