scorecardresearch

Premium

अमेरिकेत पोहोचल्यानंतर इमिग्रेशनच्या रांगेत दोन तास उभे राहिले राहुल गांधी; म्हणाले…”मी आता…”

राहुल गांधी यांना प्रवाशांनी विचारलं की तुम्ही रांगेत का उभे आहात तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते चर्चेत आहे.

Rahul Gandhi in US
राहुल गांधी सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर (फोटो सौजन्य-ट्वीटर)

काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिकेला पोहचले आहेत. सॅनफ्रान्सिकोमध्ये त्यांनी अमेरिकेतल्या भारतीयांशी चर्चा केली. तसंच अमेरिकेतल्या खासदारांनाही ते भेटणार आहेत. राहुल गांधी मंगळवारी उशिरा अमेरिकेला पोहचले. सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर राहुल गांधींचं स्वागत इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोडा आणि त्यांच्या सहाकाऱ्यांनी केलं. काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी इमिग्रेशनच्या रांगेत दोन तास उभे होते. त्यांना इमिग्रेशन क्लिअर होईपर्यंत दोन तास वाट बघावी लागली.

इमिग्रेशनच्या रांगेत जेव्हा राहुल गांधी उभे होते तेव्हा त्यांनी त्यांच्या विमानात सहप्रवासी असलेल्या अनेकांसह सेल्फी काढले.त्यावेळी लोकांनी राहुल गांधींना विचारलं की तु्म्ही रांगेत का उभे आहात? त्यावर राहुल गांधी म्हणाले, “मी आता खासदार नाही, सामान्य माणूस आहे. मला हे सगळं आवडतं.”

israel war hamas terrorist
“ना मोहीम, ना गोळीबार…हे युद्ध आहे”, हमासच्या हल्ल्यानंतर नेतान्याहूंनी ठणकावलं; म्हणाले, “त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी…!”
uddhav-thackeray-and-eknath-shinde
“पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये मदत करायचो”, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले, “नशीब…”
rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
बंडखोरांच्या अपात्रतेबाबतच्या घडामोडींना वेग, दिल्लीतील भेटीगाठीवर राहुल नार्वेकर म्हणाले…
Rahul Gandhi
“चाकं असलेली बॅग डोक्यावर कशाला घ्यायची?” भाजपाकडून राहुल गांधींची खिल्ली

राहुल गांधींचा सॅन फ्रान्सिस्को दौरा सुरु झाला आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर राहुल गांधी एक पत्रकार परिषदही घेणार आहेत. तसंच वॉशिंग्टन डीसी आणि थिंक टँक सह बैठकही करणार आहेत. सहा दिवसांचा हा दौरा असणार आहे. भारतीय अमेरिकन्सनाही संबोधित करु शकतात. तसंच वॉल स्ट्रीटचे अधिकारी आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांशीही चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यांचा हा दौरा ४ जूनला न्यूयॉर्कमध्ये त्यांची एक सभा होईल त्यानंतर या दौऱ्याचा समारोप होणार आहे.

मार्चमध्ये गेली राहुल गांधींची खासदारकी

मोदी या आडनावावरुन एक वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ मध्ये निवडणूक प्रचारा दरम्यान केलं होतं. यानंतर त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला. हे प्रकरण सुरत कोर्टात गेलं. सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधींना खासदारकी गमवावी लागली. खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींनी त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्टही सरेंडर केला होता. तसंच दिल्ली उच्च न्यायालयात सामान्य पासपोर्ट मिळावा म्हणून अर्ज केला होता. जो अर्ज न्यायालयाने मंजूर केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: I am a common man says rahul gandhi as he arrives in us san francisco scj

First published on: 31-05-2023 at 08:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×