मी आधी भारतीय, मग राजस्थानी – सरन्यायाधीश

सरन्यायाधीश आऱ एम़ लोढा राजस्थानी आहेत़ त्यामुळे राजस्थान आणि अन्य राज्य यांच्यातील खटल्यापासून त्यांनी दूर राहावे

सरन्यायाधीश आऱ एम़ लोढा राजस्थानी आहेत़  त्यामुळे राजस्थान आणि अन्य राज्य यांच्यातील खटल्यापासून त्यांनी दूर राहावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर लोढा यांनी तीव्र नापसंती दर्शविली़  मी भारतात जन्मलो आह़े  मी आधी भारतीय आहे आणि मग राजस्थानी, असेही त्यांनी याचिकाकर्त्यांना बजावल़े ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी ही मागणी केली होती़  त्यामुळे इतका मोठा अनुभव असलेल्या एका ज्येष्ठ वकिलाने अशी मागणी करणे अत्यंत खेदजनक असल्याचेही सरन्यायाधीशांनी या वेळी नमूद केले.  पाणीवादासंदर्भातील खटल्याबाबतच्या सुनावणीप्रसंगी ही मागणी केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: I am indian first then and rajasthani says chief justice

ताज्या बातम्या