काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालचे भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी ‘नबन्ना चलो’निषेध मोर्चाचं आयोजन केलं होते. या मोर्चावेळी बंगाल पोलिसांनी सुवेंदू अधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. तेव्हा केलेल्या एका विधानावरून अधिकारी यांना ट्रोल करण्यात आलं होते. त्याला धरूनच तृणमूल काँग्रेसच्या एका आमदाराने अधिकारी यांची खिल्ली उडवली आहे.

‘नबन्ना चलो’मोर्चावेळी महिला पोलीस अधिकारी सुवेंदू अधिकारी अटक करत होती. यावेळी अटकेचा प्रतिकार करताना सुवेंदू अधिकारी यांनी ‘माझ्या शरीराला हात लावू नको, तू एक स्त्री आहेस आणि मी एक पुरुष आहे,’ असं विधान केलं होते. त्यावरून तृणमूल काँग्रेसचे आमदार इद्रिस अली यांनी कुर्ता परिधान करून सुवेंदू अधिकारी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या कुर्तावर लिहलं की, ‘ईडी, सीबीआय माझ्या शरीरीला हात लावू शकत नाही, मी पुरूष आहे.’ इद्रिस अली यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदावरुन नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु असताना राहुल गांधींचं मोठं विधान, निवडणुकीला मिळणार वळण?

दरम्यान, टीएमसीने देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला होता. संबंधित व्हिडीओ शेअर करताना टीएमसीने आपल्या ट्वीटमध्ये लिहलं, “भाजपाच्या ५६ इंच छातीच्या मॉडेलचा भंडाफोड, भाजपाची नवी घोषणा: माझ्या शरीराला स्पर्श करू नका. मी पुरुष आहे.”

संबंधित प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सुवेंदू अधिकारी यांनी सांगितलं की, “मी कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. केवळ पुरुष पोलीस अधिकारी बोलवण्यासाठी आपण ते विधान केलं.”