“राजीनाम्यानंतर सोनिया गांधी मला फोन करुन सॉरी म्हणाल्या”; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा दावा

पक्षश्रेष्ठींना आपल्या कार्यक्षमतेबद्दल शंका असल्याने आपल्याला अपमानित वाटत असल्याचं कारण देत कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

पंजाबच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ सुरू आहे. पक्षश्रेष्ठींना आपल्या कार्यक्षमतेबद्दल शंका असल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असं कारण देत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी फोन करुन आपल्याला सॉरी म्हणाल्याचा दावा केला आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, “सोनिया गांधी यांनी मला सकाळी फोन केला पण मी तो उचलू शकलो नाही. त्यानंतर मी त्यांना पुन्हा फोन केला आणि हे सगळं काय चाललंय याबद्दल विचारणा केली आणि अशा परिस्थितीत मी राजीनामा देणं योग्य आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यावर त्या म्हणाल्या की ठीक आहे, द्या तुम्ही राजीनामा आणि त्यानंतर त्या म्हणाल्या सॉरी अमरिंदर”.


अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावं मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत दाखल होत आहे. मात्र राहुल गांधी यांचे आप्त, माजी खासदार आणि पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे.

याशिवाय पंजाब सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. या पदासाठी चरणजीत सिंग चन्नी, राजकुमार वेरका तसंच सुखजिंदर सिंग रंधावा यांची नावे समोर येत आहेत. दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक दलित समुदायातील असेल अशीही माहिती मिळत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: I am sorry amarinder congress president sonia gandhi on phone call claims amarinder singh after resignation vsk

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या