जर्मनी स्थित मर्सिडीज-बेंज कंपनीने पहिली भारतीय बनावटीची EQS 580 4MATIC EV ही विजेवर चालणारी कार लाँच केली आहे. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यानंतर नितीन गडकरी यांनी भारतीय विजेवर चालणाऱ्या वाहनांचा बाजार, भंगार ( स्र्कॅप ) यावरती भाष्य केलं.

नितीन गडकरी म्हणाले की, “सरकारी माहितीनुसार देशात १.२ कोटी वाहन भंगारात जाण्यासाठी तयार आहे. सध्यातरी ४० युनिटच्या मार्फत भंगार वाहनांचे रिसायकल-बिन करण्यात येत आहे. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात चार युनिट तयार करण्याची सरकारची क्षमता आहे. त्यानुसार देशात २,००० भंगार युनिट सुरु करु शकतो.”

हेही वाचा – संपूर्ण देशात 5G सेवा कधी उपलब्ध होणार? मुकेश अंबानी म्हणतात…!

“मर्सिडीजने आपले उत्पादन वाढवावे, तरच वाहनांच्या किंमती कमी होण्यास मदत होईल. आम्ही तर मध्यमवर्गीय लोक आहेत. तुमची कार विकत घेऊ शकत नाही. तुम्ही कच्चा माल तयार करण्यासाठी रिसायकल-बिनचे युनिट तयार करा. त्यामाध्यमातून वाहनांची किंमत ३० टक्क्यांनी कमी होण्यास मदत मिळेल. यासाठी सरकार चालना देत असून, सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे,” असेही गडकरी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा –  PFI सदस्याच्या घरी सापडली RSS च्या पाच नेत्यांची नावं, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मोठा निर्णय

“सध्या देशात १५.७ लाख विजेवर चालणाऱ्या वाहनांची नोंद झाली असून, ३३५ टक्के विक्रीतही वृद्धी झाली आहे. सध्या देशात महामार्ग झाल्याने मर्सिडीजच्या विजेवरील वाहनांना चांगला प्रतिसाद मिळेल. भविष्यात वाहन उद्योगाची उलाढाल ७.८ लाख कोटीपर्यंत जाण्याच्या शक्यता आहे. यामध्ये ३.५ कोटी वाहनांची निर्यात होईल. तर, १५ लाख कोटींचा हा उद्योग बनवण्याचे माझे स्वप्न आहे,” असेही नितीन गडकरी यांनी सांगितलं.