Shahbaz Sharif Condom Remark : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी इराण आणि इस्रायल युद्धाचा निषेध नोंदवण्यासाठी एक पोस्ट लिहिली खरी. पण ही पोस्ट त्यांच्या खिल्लीचा विषय ठरली. कारण पोस्ट लिहिताना त्यांनी एक घोडचूक केली ज्यामुळे जगात त्यांचं हसं होतं आहे. I Condom असं त्यांनी लिहिलं ज्यामुळे त्यांची खिल्ली उडवली जाते आहे. Condemn या शब्दाचं स्पेलिंग पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चुकवलं. त्यामुळे त्यांची ही पोस्ट आता व्हायरल झाली आहे. पंतप्रधानांकडून अशी चूक कशी काय होऊ शकते असाही प्रश्न लोक विचारत आहेत.

शाहबाज शरीफ यांची पोस्ट व्हायरल

I Condemn असं शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांना त्यांच्या पोस्टमध्ये म्हणायचं होतं. इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा मी निषेध नोंदवतो हा त्यांच्या पोस्टचा अर्थ होता. पण त्यांनी त्याऐवजी Condom असं लिहिल्याने त्यांची खिल्ली उडवली जाते आहे. पाकिस्तानच्या नागरिकांचा शिक्षणाचा स्तर काय हे त्यांच्या देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या पोस्टवरुन कळतं आहे असंही सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत. २८ फेब्रुवारीला इस्रायल आणि इराणचं युद्ध सुरु झालं. त्यानंतर इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई करत इराणचे प्रमुख नेते अयातुल्ला खामेनी यांच्या कार्यालयावर आणि घरावर क्षेपणास्त्र डागली, या घटनेत खामेनी यांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद जगात उमटले. इस्रायलने केलेला हल्ला हा निषेधार्ह आहे असं पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना म्हणायचं होतं. ‘कंडेम’ या इंग्रजी शब्दाऐवजी त्यांनी कंडोम हा शब्द लिहिला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेली ही चूक त्यांना महागात पडली आहे. कारण जगभरातल्या सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जाते आहे.

Shahbaz Sharif News
शाहबाज शरीफ यांनी निषेध नोंदवत असताना केली घोडचूक (फोटो-सोशल मीडिया)

सोशल मीडियावरची पोस्ट डिलिट करण्यात आली पण स्क्रीन शॉट व्हायरल

सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तातडीने ही पोस्ट डिलिट केली. पण तोपर्यंत या पोस्टचे स्क्रीन शॉट व्हायरल झाले होते. तसंच शाहबाज शरीफ यांना प्रचंड ट्रोल केलं जातं आहे. काही लोक ही पोस्ट एडिटेड आहे का? याचीही चर्चा करत होते. पण सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आणि शाहबाज शरीफ यांच्यावर प्रचंड टीका सुरु झाली. तसंच अनेक लोकांनी पाकिस्तानच्या शिक्षणाचा दर्जा कसा आहे? यावरुन कळतंय असं म्हणत कमेंट केल्या आहेत.