मी बसवराज बोम्मई शपथ घेतो की…; कर्नाटकला मिळाले नवे मुख्यमंत्री

बसवराज बोम्मई यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

I swear Basavaraj Bommai that- Karnataka gets new CM
बोम्मई कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री असणार आहेत (photo ani)

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर भाजपाच्या दिल्लीतील नेतेमंडळींकडून दबाव असल्याच्या अनेक चर्चा या काळात रंगल्या. मात्र, आपल्यावर कोणताही दबाव नसून स्वेच्छेने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं येडियुरप्पांनी सोमवारी स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर बसवराज बोम्मई यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

बसवराज बोम्मई यांनी आज ११ वाजता मुख्यमंत्री पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधी दरम्यान माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा उपस्थित होते. या बरोबरच भाजपाचे इतर अनेक बडे केंद्रीय व राज्य ज्येष्ठ नेतेही या कार्यक्रमात उपस्थित होते. बोम्मई कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री असणार आहेत.

 

हेही वाचा- ममता बॅनर्जी-सोनिया गांधी भेटीवर संजय राऊतांचं महत्वाचं विधान; म्हणाले…

कोण आहेत बसवराज बोम्मई?

येडियुरप्पांप्रमाणेच बसवराज बोम्मई हे देखील लिंगायत समाजाचे नेते असून ते येडियुरप्पांचेच निकटवर्तीय मानले जातात. ६१ वर्षीय बसवराज बोम्मई यांनी आत्तापर्यंत गृहविभाग, कायदे विभाग, सांस्कृतिक कार्यमंत्रीपद अशा अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी आत्तापर्यंत पार पाडली. मंगळवारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी बोम्मई यांनी भाजपाचे केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी आणि अर्जुन सिंह यांची बंगळुरूमध्ये भेट घेतली. याशिवाय, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी पक्षाच्या ४० आमदारांनी देखील त्यांची भेट घेतल्याचं देखील सांगितलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: I swear basavaraj bommai that karnataka gets new cm srk

फोटो गॅलरी