IPL Founder Lalit Modi Interview: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलची स्थापना २००८ साली झाली. नुकताच या स्पर्धेचा १९ वा हंगाम पार पडला. १९ वर्षात आयपीएलची प्रसिद्धी तसूभरही कमी झालेली नाही. आयपीएलचे संघ वाढत गेले, तसे या स्पर्धेची लोकप्रियताही वाढत गेली. ललित मोदी यांनी आयपीएलची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांनी स्पर्धा सुरू केल्यानंतर तीन वर्षांनी २०१० साली भारतातून पळ काढला. विविध आरोप आणि चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे ललित मोदी ठामपणे सांगत आले आहेत. मात्र आता त्यांनी मुलाखती देण्याचा सपाटा लावला असून आयपीएलची निर्मिती, तेव्हाची राजकीय परिस्थिती आणि पळून जाण्याचा निर्णय का घ्यावा लागला? याबाबत मोदी यांनी भाष्य केले आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने लंडन येथे ललित मोदी यांची विस्तृत मुलाखत घेतली. या मुलाखतीत ललित मोदी यांनी क्रिकेट, राजकारण, बॉलिवूड, माध्यम संस्था, कौटुंबिक परिस्थिती आणि स्वतःची उंची जीवनशैली यावर मनमोकळे भाष्य केले. अभिनेत्री सुष्मिता सेनबरोबर असलेल्या प्रेम प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले.

एएनआयशी बोलताना आपल्या जीवनशैलीबाबत बोलताना ललित मोदी म्हणाले, “मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी कुणासाठीही माझी जीवनशैली बदलणार नाही. मी आमच्या कौटुंबिक व्यवसायात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पैसा कमवला आहे. मी हिऱ्याचा चमचा घेऊन जन्माला आलो होतो. जेव्हा तुम्ही माझ्यावर काही कोटी रुपये घेतल्याचा आरोप करता, तेव्हा मी माझ्या आयुष्यात एका दिवसात त्यापेक्षा अधिक कमावत असतो. जागतिक स्तरावर नावाजलेली कंपनी आमच्याकडे आहे. त्याचे बाजारमूल्य अडीच लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे.”

Lalit Modi interview Dawood Ibrahim | Lalit Modi exposed IPL betting D-Company | ललित मोदी दाऊद इब्राहिम धमकी | आयपीएल सट्टा बाजार स्पॉट फिक्सिंग रेकॉर्ड २०२६
दाऊद इब्राहिमच्या धमकीमुळे क्रिकेट सोडल्याचा ललित मोदींचा खळबळजनक खुलासा. (फोटो – ANI/ Canva) (बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

ललित मोदी पुढे म्हणाले, “मी या व्यवसायाचा भाग आहे. आता हा व्यवसाय माझ्या मुलांना भेट दिला असून ते त्याचे मालक आहेत. मी सध्या इथे सुंदर घरात राहत असून आनंदात आयुष्य घालवतोय. मी कुठेही फिरायला जातो. मी हे कसे करत असेल, असे तुम्हाला वाटते? मी १०-१२ कोटी रुपये घेतल्याचा म्हटले जाते. पण तेवढे तर मला आठवडाभरही पुरणार नाहीत. जे आहे ते आहे.”

मी श्रीमंतीत जन्माला आलो. मी इतर कुणासाठी माझी जीवनशैली का बदलू? मी माझे आयुष्य इतर कुणासाठी का जगू? माझे आजोबा अशा पद्धतीने जगले नाहीत. माझे वडीलही इतर कुणासाठी जगले नाहीत, असेही विधान ललित मोदी यांनी या मुलाखतीदरम्यान केले.

ललित मोदींचे व्यवसाय कोणते?

या मुलाखतीत बोलत असताना ललित मोदी यांनी कुटुंब आणि स्वतःच्या व्यवसायांची माहिती दिली. मोदी एंटरटेन्मेंट नेटवर्क्स बद्दलही त्यांनी माहिती दिली. “मी हे सर्व व्यवसाय उभारले. मुद्दा असा आहे की, मी माझ्या आयुष्यात कोट्यवधी डॉलर्स कमावले. हे माझ्या कुटुंबाचे पैसे नाहीत, तर मी एकट्याने कमावले आहेत. तर मग मी ते स्वतःवर खर्च केले तर काय झाले?”, आपल्या उधळपट्टीच्या जीवनशैलीचे समर्थन करत असताना ललित मोदींनी हे उदाहरण दिले.

ललित मोदींचे क्रिकेटमध्ये योगदान काय?

ललित मोदी हे आयपीएलचे पहिले अध्यक्ष होते. त्यांनी २००८ ते २०१० हे तीन वर्ष स्पर्धेचे आयोजन केले होते. या तीन वर्षांच्या काळात त्यांनी चॅम्पियन्स लीग टी२० स्पर्धेचेही अध्यक्षपद भूषविले होते. २००५ ते २०१० या काळात ते बीसीसीआयचे उपाध्यक्ष होते. राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे दोन वेळा अध्यक्ष आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते.

Lalit Modi Interview
‘आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार व्यक्ती’, ललित मोदींचे पार्टीमध्ये विधान (बातमी वाचण्यासाठी क्लिक करा)

‘विजय मल्ल्या माझा मित्र पण…’

बँकेतून कर्जापोटी घेतलेले हजारो कोटी रुपये बुडवल्याप्रकरणी व्यावसायिक विजय मल्ल्या भारतातून फरार झालेला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांनी एकत्र पार्टी करतानाचा आणि आम्ही दोघे पळपुटे आहोत, असे बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या विधानानंतर ललित मोदी यांनी माफी मागितली होती.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ललित मोदी यांनी विजय मल्ल्या माझे मित्र असल्याचे म्हटले. “तो माझा मित्र आहे. त्याची वेगळीच कथा आहे. त्याचा नेमका विषय काय, याची मला फारशी माहिती नाही. पण बँकेशी संबंधित काही समस्या आहे, एवढे माहीत आहे. तुम्हाला माहितीये का, आम्ही कधीच कुणाकडून पैसे घेतले नाहीत. मी फक्त पैसे दिले. मी किंवा माझ्या व्यवसायाने कधीच बँकेकडून कर्ज घेतले नाही. आम्ही एक ग्राहक ब्रँड आहोत. आम्ही मार्लबोरो उत्पादित करतो. आमचा ब्रँड जगभरात लोकप्रिय आहे”, असे ललित मोदी म्हणाले.