भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीगीर महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांना या पदावरुन हटवण्याचीही मागणी केली आहे. २८ मे रोजी म्हणजेच जेव्हा नव्या संसदेचं उद्घाटन होतं त्यादिवशी या सगळ्यांनी मार्च काढण्याचंही ठरवलं पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर आम्ही आमची पदकं गंगा नदीत विसर्जित करु अशी भूमिका या पैलवानांनी घेतली. मात्र त्यांना शेतकरी नेत्यांनी अडवलं. आता या सगळ्यावर बृजभूषण शरण सिंह यांचं वक्तव्य समोर आलं आहे. गंगेत मेडल्स विसर्जित केल्याने मला फाशी होणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे बृजभूषण शरण सिंह?

“माझ्यावर आरोप झालेत त्याचा एक तरी पुरावा द्या. मी कुणासोबत चुकीचं वर्तन केलं? कधी केलं ते सांगा. मी आधीही सांगितलं होतं मी आजही सांगतो आहे. माझ्याविरोधातला एक आरोप जरी सिद्ध झाला तर त्यादिवशी मी स्वतः फाशी घेईन. कुणाला काही सांगायची गरज लागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. चार महिने झाले आहेत. कुस्तीगीर महिलांचं म्हणणं आहे मला फाशी झाली पाहिजे. सरकार मला शिक्षा देत नाहीये तर आपली मेडल्स घेऊन गंगा नदीत विसर्जन करायला कुस्तीगीर गेले होते. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, गंगेत मेडल्स विसर्जित केल्याने मला फाशी दिली जाणार नाही. तुमच्याकडे कुठलाही पुरावा आहे तर तो पोलिसांना आणि न्यायालयाला द्या. न्यायालयाने मला फाशी दिली तर मी फासावर जायलाही तयार आहे. हा इमोशनल ड्रामा करु नका. ” असं उत्तर बृजभूषण सिंह यांनी दिलं आहे.

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”

बृजभूषण सिंह म्हणाले की कलियुग आहे काहीही होऊ शकतं म्हणून मी लढतो आहे. रामाला वनवास झाला नसता तर इतिहास घडला असता का? रामाला जो वनवास झाला त्याचं श्रेय कैकयी आणि मंथरा यांना दिलं गेलं पाहिजे. माझी या कुस्तीगीरांशी काहीही दुश्मनी नाही, कुठलंही वैर नाही. यांच्या यशात माझा वाटा आहे. आंदोलनाला बसण्याच्या दहा दिवस आधीपर्यंत मला देव मानत होते. माझ्या कार्यकाळात जी टीम १८ व्या क्रमांकावर होती ती टॉप फाईव्हमध्ये आली. ऑलिम्पिकच्या सात पदकांपैकी पाच मी अध्यक्ष झाल्यापासूनच्या कार्यकाळात आले. आता मला आणखी मोठं काम करायचं आहे.

१९७५ मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली तेव्हा काँग्रेस सोडून इतर सगळ्यांना तुरुंगात जावं लागलं होतं, त्यावेळी मी पण तुरुंगात गेलो होतो. आज जो पाठिंबा मला मिळतोय तो कुणालाही मिळालेला नाही. माझ्या बाजूने क्षत्रिय, ब्राह्मण, तेली, मुस्लीम आणि जाट आहेत. माझ्यासह हरियाणाची ८५ टक्के जनता आहे असंही बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे.

गंगेत पदकं विसर्जित करायला गेले होते पैलवान

बृजभूषण सिंह यांच्या या वक्तव्यानंतर आता कुस्तीगीर काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मंगळवारी बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक हे तिघेही हरिद्वारला गेले होते. तिथे गंगा नदीत ते तिघेही त्यांची मेडल्स विसर्जित करणार होते. मात्र शेतकरी नेते नरेश टिकैत त्या ठिकाणी गेले. तिथे त्यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर आता या पैलवानांनी सरकारला बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात निर्णय घेण्यासाठी पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.