कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील बोगापुरा गावाजवळ भारतीय हवाई दलाचं ट्रेनिंग विमान कोसळलं. नियमित उड्डाणानंतर हे विमान काहीच वेळानंतर एका शेतात कोसळलं, जमिनीवर पडताच या विमानाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि काही मिनिटात आग विझवली. सुदैवाने दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. विमान कोसळण्यापूर्वी दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर उड्या मारल्या होत्या.

या घटनेची माहिती देताना भारतीय हवाई दलातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, हवाई दलाचं ट्रेनिंग विमान आज दुपारच्या सुमारास कोसळलं. यामध्ये एक महिला पायलटही होती. दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. अपघाताचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. वरिष्ठांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

भारतीय हवाई दलाने याबाबत एक ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, कर्नाटकातील चामराजनगरमध्ये हवाई दलाचं किरण हे ट्रेनर विमान कोसळलं आहे. विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. विमान कोसळण्यापूर्वी ते दोघेही बाहेर पडले होते. हा अपघात नेमका का झाला याची कारणं जाणून घेण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा >> धक्कादायक! लहान भावावर आई-वडिलांचं जास्त प्रेम असल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलीनं केली भावाची हत्या

या घटनेचे वेगवेगळे व्हिडीओ समोर आले असून, त्यात विमान क्रॅश झाल्यानंतर शेतात पडल्याचं दिसत आहे. त्यानंतर अनेक शेतकरी आणि गावकरी विमानाभोवती जमा झाले होते. तसेच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवली.

Story img Loader