सरकारी अधिकाऱ्यांची मनमानी सामान्य जनतेला भोगावी लागत असल्याची अनेक उदाहरणं वेळोवेळी समोर येत असतात. असाच काहीसा प्रकार गेल्या वर्षी राजधानी दिल्लीत घडला होता. एका आयएएएस दाम्पत्यानं त्यांच्या पाळीव कुत्र्याला रपेट मारता यावी म्हणून एक आख्खं स्टेडियम रिकामं करायला लावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. या घटनेची तेव्हा मोठी चर्चा पाहायला मिळाली होती. या दाम्पत्याची दिल्लीबाहेर बदली करून तेव्हा तात्पुरती कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता त्यातील महिला आयएएस अधिकाऱ्यावर सक्तीच्या निवृत्तीची कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय झालं होतं?
जवळपास दीड वर्षापूर्वी मे महिन्यात हा प्रकार घडला होता. २६ मे २०२२ रोजी आयएएस रिंकू डग्गा आणि त्यांचे पती संजीव खैरवार हे संध्याकाळी दिल्लीतल्या त्यागराज स्टेडियमवर फेरफटका मारायला आले असता तिथे अनेक खेळाडू सराव करताना दिसले. तसेच, काही नवोदित खेळाडूंचे व विद्यार्थ्यांचे पालकही तिथे उपस्थित होते. संबंधित आयएएस दाम्पत्याबरोबर त्यांचा एक पाळीव कुत्राही होता. आपल्या कुत्र्याला फेरफटका मारण्यात खेळाडू व त्यांच्या पालकांची अडचण होत असल्याची तक्रार या दाम्पत्यानं केली.
कुत्र्याला विनासायास फेरफटका मारता यावा, यासाठी रिंकू डग्गा व संजीव खैरवार यांनी ते आख्खं स्टेडियमच कर्मचाऱ्यांना रिकामं करायला लावलं. ‘साहेबां’चा आदेश आल्यामुळे कर्मचाऱ्यांनीही सर्व खेळाडू व त्यांच्या पालकांना स्टेडियमच्या बाहेर काढलं आणि आयएएस दाम्पत्याचा त्यांच्या पाळीव कुत्र्यासोबत निवांत फेरफटका सुरू झाला. त्यांचा फेरफटका मारून झाल्यानंतरच खेळाडूंना मैदानात येण्याची परवानगी मिळाली.
काय झाली कारवाई?
माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर प्रशासनाला जाग आली. हे प्रकरण केंद्र सरकारपर्यंत गेल्यानंतर गृहमंत्री अमित शाह
नेमका काय आहे प्रकार?
दिल्लीतल्या त्यागराज स्टेडियमची देखभाल-व्यवस्थापन दिल्ली सरकारकडून केलं जातं. २०१०च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी हे मैदान तयार करण्यात आलं होतं. दिवसभर उष्णतेमुळे खेळाडूंना सराव करण्यासाठी अडचणी येत असल्यामुळेच संध्याकाळी सातनंतर या खेळाडूंना मैदानात सराव करण्याची परवानगी देण्यात आली होती, पण आता संध्याकाळी १० वाजेपर्यंत दिवसभर खेळाडूंना सरावाची परवानगी असेल, असं तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
कोण आहे हे IAS दाम्पत्य?
५४ वर्षीय रिंकू डग्गा या १९९४ च्या बॅचच्या AGMUT काडरच्या अधिकारी आहेत. दिल्लीच्या महसूल विभागात त्या कार्यरत होत्या. त्यानंतर कारवाई म्हणून त्यांची बदली अरुणाचल प्रदेशच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून करण्यात आली. त्यांचे पती संजीव खैरवार हेही १९९४ च्याच बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांना कारवाई म्हणून लडाखला पाठवण्यात आलं होतं.