Pooja Khedkar Debarred from UPSC Exams: गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असणाऱ्या पूजा खेडकर यांची उमेदवारी UPSC नं अखेर रद्द केली आहे. आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीनं रद्द केल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. विशेष म्हणजे यापुढे यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, असंही यूपीएससीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे यूपाएससीनं त्यांच्यावर ही कारवाई केलेली असताना दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप पतियाला कोर्टानं निर्णय दिलेला नाही.

पूजा खेडकर यांच्या उमेदवारीबाबत UPSC नं केलेल्या कारवाईबाबत एएनआयनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये माहिती दिली आहे. ‘यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना देण्यात आलेली प्रोव्हिजनल उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच, यापुढील काळात यूपीएससीकडून घेण्यात येणारी कोणतीही परीक्षा त्यांना कधीच देता येणार नाही, असं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे’, अशी माहिती एएनआयच्या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

Audit Provisions in the Income Tax Act
प्राप्तिकर कायद्यानुसार लेखापरीक्षण म्हणजे काय? नवीन तरतुदी कुणाला लागू?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
contract teachers, agitation ,
कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या निर्णयावर टीकेची झोड, निर्णय रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा
dead lizard found in spice packet
Dead Lizard Found In Spices : धक्कादायक! पोषण आहाराच्या मसाल्यात चक्क पाल; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ…
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
Verification of Study Level Action Plan in December sangli news
सांगली: अध्ययन स्तर कृती आराखड्याची डिसेंबरमध्ये पडताळणी
Return of demand letter for 258 Agriculture seats from MPSC
कृषीच्या २५८ जागांच्या मागणीपत्राची एमपीएससीकडून परतपाठवणी
MPSC, civil services, joint preliminary examination, Maharashtra Public Service Commission, 25 august, agricultural service,
‘एमपीएससी’ : कृषी सेवा परिक्षेबाबत मोठी बातमी; अधिकाऱ्यांनी सांगितले की…

नेमकं प्रकरण काय?

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्याचा ठपका पूजा खेडकर यांच्यावर आधी ठेवण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. पुढे पूजा खेडकर यांनी सनदी सेवेत निवड होताना त्यांच्या दिव्यंगत्वाबाबत चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप करण्यात आला. शिवाय, त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही त्यांनी ओबीसी क्रिमी लेअर सुविधेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, यासाठी त्यांनी परीक्षेसाठी अर्ज करताना नावामध्येही वारंवार बदल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी याचबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा उल्लेख न्यायालयातील सुनावणीमध्ये करण्यात आला.

Pooja Khedkar Bail Plea: “…म्हणून मला लक्ष्य केलं जात आहे”, पूजा खेडकर यांचा न्यायालयात आक्रमक युक्तिवाद; मांडले ‘हे’ मुद्दे!

पूजा खेडकर यांनी सनदी सेवेत निवड होताना चुकीची कागदपत्रं सादर केली होती, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यात त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही त्यांनी क्रीमिलेअर प्रमाणपत्राचा फायदा घेऊन आयएएस पद पदरात पाडून घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, त्यांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रामध्येही अनियमितता असल्याचा दावा न्यायालयातील सुनावणीदरम्यान करण्यात आला आहे.

pooja khedkar bail plea in patiala court
पूजा खेडकर यांच्या अंतरिम जामीन अर्जावर पतियाला कोर्टात सुनावणी (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पालकांचा खरंच घटस्फोट झालाय?

पूजा खेडकर यांच्या पालकांचा घटस्फोट झालाय की नाही? याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात असल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता ४० कोटींहून अधिक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांना क्रीमीलेअर प्रमाणपत्र कसं मिळालं? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच पालकांचा घटस्फोट झाला असून आपण आईकडे राहतो, त्यामुळे आपलं उत्पन्न कमी आहे, असा पूजा खेडकर यांचा दावा समोर आला. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

नव्या अध्यक्षांनी पदभार घेण्यापूर्वीच कारवाई

दरम्यान, पूजा खेडकर प्रकरण चर्चेत आल्यानंतर यूपीएससीच्या नेतृत्वामध्ये बदल करण्यात आले होते. त्यानुसार १९८३ च्या बॅचच्या कर्नाटक काडरच्या सनदी अधिकारी प्रीती सुदान यांची UPSC च्या चेअरपर्सन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी प्रीती सुदान पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, त्यांनीपदभार स्वीकारण्याच्या आदल्याच दिवशी पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीनं कारवाईचा बडगा उगारला आहे. यूपीएससीच्या चेअरपर्सन होणाऱ्या सुदान या फक्त दुसऱ्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. याआधी १९९६ साली आर. एम. बॅथ्यू यूपीएससीच्या चेअरपर्सन म्हणून नियुक्त झाल्या होत्या.